फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील PSI निघाला चालाख! शरण येण्यापूर्वी केले मोठे काम, नेमकं काय केलं?
फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील आरोपातील पीएसआय गोपाल बदनेने पोलिसांना शरण येण्यापूर्वी जे काही केले ते ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी घरातून अटक केली तर पीएसआय गोपाल बदने दोन दिवस फरार होता. त्यानंतर तो फलटण पोलिस ठाण्यात जाऊन हजर झाला. या दोन दिवसात त्याने एक मोठे काम केले. आता नेमकं काय केलं? जाणून घ्या…
आरोपी गोपाल बदने झाला होता फरार
महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती मिळताच आरोपी गोपाल बदने हा फरार झाला होतो. पहिल तो पंढरपूरला जाऊन लपला. त्यानंतर त्याने सोलापूर गाठले आणि नंतर कुटुंबीयांना भेटण्यासाठी तो बीडला गेला. शेवटी आरोपी मध्यरात्री फलटण पोलिस ठाण्यात जाऊन सरेंडर झाला. या दरम्यान, गोपाल बदनेने महिला डॉक्टर प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा लपवा. यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाचा: महिला डॉक्टर राहात असलेलं ते हॉटेल कोणाचं? मालकाचे आहे बड्या नेत्याशी खास कनेक्शन?
नेमकं काय घडलं होतं?
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदनेने मोबाईल लपवला. पोलिसांना शरण येण्यापूर्वी त्याचा मोबाईल गोपाल बदनेने लपवला आहे. पोलिसांपासून मोबाईल कुठे आहे, याबाबतची माहिती बदने लपवत आहे. आरोपी आणि महिला डॉक्टरचे नेमके संबंध काय? याचा तपास करण्यासाठी या गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा गोपाल बदनेचा मोबाईल असणार आहे. तर दोन्ही आरोपींनी महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे.
बीडमध्ये रस्ता रोको आंदोलन
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी बीड येथील नागरिकांनी केली आहे. यासाठी त्यांनी बीड ते परळी मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे. उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच जरांगे पाटलांचे अनेक सहकारी देखील आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसत आहे.
