AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला डॉक्टरने चेकइन केलेलं ते हॉटेल कोणाचं? मालकाचे आहे बड्या नेत्याशी खास कनेक्शन?

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. डॉक्टरने आत्महत्या केलेले हॉटेल कोणाचे आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता याबाबत सुषमा अंधारे यांनी मोठा खुलासा केला आहे.

महिला डॉक्टरने चेकइन केलेलं ते हॉटेल कोणाचं? मालकाचे आहे बड्या नेत्याशी खास कनेक्शन?
Sushma AndhareImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 27, 2025 | 2:15 PM
Share

साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत महिला डॉक्टरने आत्महत्या केलेले हॉटेल कोणाचे आहे? याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्यांनी त्या हॉटेल मालकाचे एक आमदाराशी कनेक्शन असल्याचे देखील अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

प्रकरण काय?

महिला डॉक्टर संपदा मुंडे प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर राहत होती. एक दिवस अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच घरमालक प्रशांत आणि डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाला. ऐनवेळी रहायला कुठे जायचे म्हणून महिला डॉक्टरने मधूदीप हॉटेलमधील खोली दोन दिवसांसाठी बूक केली. हॉटेलमध्ये जाताना तरुणीसोबत कोणीही नव्हते. हॉटेलची खोली दोन दिवस न उघडल्यामुळे हॉटेल मालकाने शनिवारी संध्याकाळी ४ वाजता खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा तरुणीचा मृतदेह आढळला. तसेच हातावर लिहिलेली सुसाईट नोट देखील दिसली. आता सुषमा अंधारे यांनी हे हॉटेल कुणाचे आहे याबाबत खुलासा केला आहे.

वाचा: महिला डॉक्टरचं भर रात्री चेकइन, 2 दिवसांसाठी रुम बूक…मधुदीप हॉटेलमधलं खळबळजनक गूढ समोर

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैशली हगणवे प्रकरणात सुद्धा कॅरेक्टर बदनाम केले. आता सुद्धा या डॉक्टरचे कॅरेक्टर बदनाम केले. संपदा मुंडे हॉटेलमध्ये गेली कशी? रात्री एखाद्या महिलेला हॉटेल कसे मिळते? ती रात्री का गेले हॉटेलमध्ये? हे हॉटेल भोसले यांचे आहे. हा नगरअध्यक्ष पदाचा दावेदार आहे. जयकुमार गोऱ्हे बाजूला आहे यांच्यावर सुद्धा आरोप केले.

संपदाची बहिण सांगते हे अक्षर तिचे नाही. संपदा हीने आत्मत्या केली का हत्या झाली? असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केला आहे. काल फलटण मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथ गेले आणि रणजित निंबाळकर यांना क्लीन चीट दिली ते आम्हाला कळलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अशा कित्येक जणांना क्लिनचीट दिली आहे. संपदाने लिहलेले हातावरील सुसाईड नोट ही तिचे हस्ताक्षर नाही असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.