महिला डॉक्टरचं भर रात्री चेकइन, 2 दिवसांसाठी रुम बूक…मधुदीप हॉटेलमधलं खळबळजनक गूढ समोर
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया...

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरूणी यांच्यात वाद झाल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. पण त्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
तरूणी हॉटेलवर जाण्याअगोदर काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉक्टर महिला राहत होती. पण अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यमध्ये देखील वाद झाला होता. प्रशांत बनकरला राग अनावर झाला. त्याने या वादानंतर तू आमच्या इथे राहायचं नाही आणि यायचं नाही असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे जायचं म्हणून तरुणी डॉक्टरने लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात तरुणीने पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना वारंवार कॉल केले होते.
का उचलले टोकाचे पाऊल?
डॉक्टर तरुणी गेल्या आठ महिन्यांपासून प्रशांत बनकर यांच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होती. 23 तारखेला दिड वाजता महिला डॉक्टर फलटण येथील मधूदीप हॉटेलमध्ये चेकइन करण्यासाठी गेली होती. तरुणीने दोन दिवसांसाठी रुम बूक केली होती. हॉटेलमध्ये जाताना तरुणीसोबत कोणीही नव्हते. हॉटेलची खोली दोन दिवस न उघडल्यामुळे हॉटेल मालकाने शनिवारी संध्याकाळी ४ वाजता खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा तरुणीचा मृतदेह आढळला.
काय आहे प्रकरण?
तरुणीने हातावर एक नोट लिहित थेट आत्महत्या केली. पीएसआय गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर आरोप नोटमध्ये करण्यात आली. डॉक्टर तरुणीने आरोपी पीएसआयने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचेही स्पष्ट नोटमध्ये म्हटले. तरुणीने आत्महत्या केल्याचे कळताच पीएसआय गोपाळ बदने हा फलटणमधून फरार झाला. प्रशांत बनकर याला पोलिसांनी घरातून अटक केली. अनेक प्रयत्न करूनही आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचे लोकेशन मिळत नसल्याने शेवटी पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना बडतर्फ करत असल्याचा निरोप पाठवताच हातात काहीच राहिले नसल्याने आरोपी पोलिसांना शरण आला.
