आशिक गोरिला! महिलेशी करत होता फ्लर्ट, पाठून मादी आली अन्… खळखळून हसायला भाग पाडणारा व्हिडीओ नक्की पाहा
सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडीओमध्ये एक नर गोरिला पर्यटक महिलेशी फ्लर्ट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी जोरदार हसण्यासोबतच प्राण्यांच्या जगातल्या नातेसंबंधाचा अनुभव घेत आहेत. व्हिडीओला दीड कोटींहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काहीही नेम नाही. पण सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये गोरिला आणि एका महिला पर्यटकाची काहीशी मजेशीर भेट दाखवण्यात आली आहे, जी पाहून कुणालाही हसू आवरता येणार नाही. काही पर्यटक हे निसर्गरम्य डोंगरात मजा करत होते. पण त्यावेळी अचनाक त्यांची नजर एका गोरिलावर पडली आणि त्यानंतर जे काही घडलं, ते पाहून इंटरनेटवर एकच हशा पिकला आहे.
व्हिडीओत नेमकं काय?
सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक नर गोरिला पर्यटकाच्या ग्रुपमधील महिला पर्यटकाला जवळ बोलवताना दिसत आहे. ती महिला पर्यटक त्या गोरिलाच्या जवळ जाते. ती त्या गोरिलाच्या जवळ गेल्यानंतर तो गोरिला तिच्यासोबत फ्लर्ट करायला सुरुवात करतो. इतकंच नाही, तर तो अगदी प्रेमाने त्या महिलेच्या केसांतून हात फिरवण्याचा प्रयत्न करतो. पण नेमक्या त्याच क्षणी एक मादी गोरिला तिथे येते.
यानंतर ती मादी गोरिला आधी थोड्या दूर थांबून हा सगळा रोमान्स शांतपणे पाहत असते. पण काही क्षणातच तिचा पारा चढतो. ती रागाने त्या नर गोरिलाकडे बघायला लागते. यावेळी त्या गोरिलाला आपली पत्नी शेजारी आल्याचे कळताच तो त्या महिलेचे केस सोडतो. पण त्या मादी गोरिलाच्या संताप इतका अनावर होतो की त्याच्या डोक्यावरचे केस पकडते आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात करते. यानंतर तो नर गोरिला शांत बसतो.
माणसांचे सोडा प्राण्यांनाही बायकोचा धाक
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतं आहे. सध्या या आशिक गोरिलाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मादी गोरिलाने नर गोरिलाची केलेली धुलाई हे दृश्य खरंच पाहण्यासारखं आहे. माणसांचे सोडा प्राण्यांनाही बायकोचा धाक किती असतो, असे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
Male Gorilla grabs Girls Hair, Gets Beaten by his Female Gorilla 🤣 pic.twitter.com/uZG5Fo3gqG
— Rosy (@rose_k01) July 11, 2025
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @rose_k01 या ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दीड कोटींहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये “तुम्ही माणूस असा किंवा प्राणी, बायको ही बायकोच असते.” असे म्हटले आहे. सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे.
