Video Viral : नव्या नवरीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हाती घेतले लोकलंच स्टेअरिंग; नवी कोरी साडी नेसून चालवली ट्रेन
लग्न झालं की घरातले म्हणतात,आता संसाराला लागा, तिकडे लक्ष द्या, सासरच्यांना सांभाळा! पण या नवरीबाईंना आपलं काम आणि स्वप्न, कर्तव्य दोन्ही सोबत घेऊन चालायचं ठरवलं आहे. लग्नानंतर सुंदर साडी नेसून ही नवरी थेट ट्रेन चालवण्याच्या ड्युटीवर पोहोचल्या. तिचा हाल अंदाज पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक होतं आहे.

लग्न झालं की घरातले म्हणतात,आता संसाराला लागा, तिकडे लक्ष द्या, सासरच्यांना सांभाळा! पण या नवरीबाईंना आपलं काम आणि स्वप्न, कर्तव्य दोन्ही सोबत घेऊन चालायचं ठरवलं आहे. लग्नानंतर सुंदर साडी नेसून ही नवरी थेट ट्रेन चालवण्याच्या ड्युटीवर पोहोचल्या. तिचा हाल अंदाज पाहून सोशल मीडियावर तिचं कौतुक होतं आहे.
लग्नानंतरचे दिवस म्हटलं की घरात पाहुण्यांची ये – जा, नवीन नाती, समारंभ आणि अनेक गोष्टी सुरू असतात. पण या महिलेने आपली कामाप्रती दाखवलेली निष्ठा दाखवून दिली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवी साडी नेसून कंबर खोचून आपलं कर्तव्य बजावण्यास तयार झाल्या.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोकल दिसते आहे. त्यात नवीन साडी नेसलेली एक महिला दिसते आहे. तिच्या हातातील लाल रंगाचा भरगच्च चुडा आणि केसांवरील सिंदूरामुळे ती नवी नवरी असल्याचे कळून येत आहे. हातात लोकलचा संपूर्ण कंट्रोल तिने घेतलाय. तर दुसर्या हाताने वॉकी टॉकी वरही संवाद साधताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या सह लोको पायलटने शूट केला असावा असा अंदाज आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? ती नववधू नेमकी कोणती ट्रेन चालवते आहे. याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परूंतु तिच्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओने समस्त स्त्रियांचे मन जिंकले आहे.
आपल्याकडे अजूनही अनेकदा लग्नानंतर महिलांनी आपल्या करिअरमध्ये बदल करावा. सासरच्या घरासाठी आपली स्वप्न बाजूला ठेवावी अशी अपेक्षा केली जाते. पण काही स्त्रिया या गोष्टिला अपवाद असतात.लग्न असो की आयुष्यातील आणखी कोणताही टप्पा तरी त्याला स्वत:ची स्वप्न बाजूला ठेवणं हा पर्याय कधीही असू शकत नाही.
नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष
या नवविवाहित महिला ट्रेन पायलटचा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला असून,तिचा सुंदर साडीतील लूक आणि कामाप्रती असलेली निष्ठा यांचं कौतुक केलं जातं आहे. हा एआय व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता अद्याप समोर आलेली नाही.
थोडक्यात काय तर, लग्न झालं म्हणून स्वप्नांना कुलूप लावायचं नसतं! आयुष्यात नवी माणसं येतात, नवीन जबाबदाऱ्या वाढतात, पण आपण इतक्या मेहनतीने उभं केलेले करिअरही महत्त्वाचं असतं. तिची ही गोष्ट अनेक महिलांच्या स्वप्नांना बळ देणारी आहे.