Video : काळ्या नागाशी उंदीर भिडला, केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

सध्या एक अजब-गजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. साप आणि उंदराचा हा अनोखा व्हिडीओ आहे.

Video : काळ्या नागाशी उंदीर भिडला, केलं असं काही की पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
snake and rat viral video
| Updated on: Jul 15, 2025 | 5:24 PM

Snake Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही व्हिडीओ आणि फोटो तर सामान्यांना थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर झाल्यामुळे आतापर्यंत अनेक लोकांच नशीब पालटलं आहे. प्राणी-पक्ष्यांच्या व्हिडीओंना तर लोकांची विशेष पसंदी मिळते. दरम्यान, आता सोशल मीडियावर अशाच एका आगळ्या-वेगळ्या व्हिडीओची चर्चा होत आहे. एका उंदराने सापाला चांगलंच मूर्ख बनवलंय.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सापाला सगळेच घाबरतात. पण सगळेच साप काही विषारी नसतात. उंदीर, बेडूक हे सापाचे आवडते अन्न आहे. उंदीर दिसला तर साप लगेच त्याला खाऊन टाकतो. सध्या अशाच एका साप आणि उंदराच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू फुटले असून हा साप किती मूर्ख आहे, अशी मिश्किल भावनाही व्यक्त केली जात आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठलाय हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक साप आणि उंदीर दिसत आहे. साप उंदराची शिकार करू पाहतोय. पण उंदराने स्वत:चे संरक्षण करण्यासाठी खास शक्कल लढवली आहे. साप रागात त्याचा फणा काढून उभा आहे. तो उंदराची शिकार करण्यासाठी आतूर झालाय. पण उंदीर मात्र सापाच्या थेट डोक्यावर जाऊन बसला आहे. उंदीर थेट सापाच्या फण्यावर जाऊन बसल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

उंदराची शिकार करताना सापाची धडपड

उंदीर फण्यावर जाऊन बसल्याने सापाला काहीही दिसत नाहीये. त्यामुळेच त्याला उंदराची शिकार करता येत नाहीये. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून @Shikhar_India या एक्स अकाऊंटवरून तो शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.