Viral: ‘हा’ डान्सचा व्हीडिओ पाहिलात का, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

Dance Video | या व्हीडिओत एक मुलगा आणि मुलगी डान्स करताना दिसत आहेत. मुलगा हा मुलीला डान्सच्या स्टेप्स शिकवत आहे. यामध्ये धावत जाऊन हवेत उडी मारण्याची एक स्टेप आहे. मुलाने मुलीला ही स्टेप समजावून सांगितल्यानंतर ती करायला सांगितली.

Viral: हा डान्सचा व्हीडिओ पाहिलात का, सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल
डान्स
| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 10:24 AM

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही मजेशीर व्हीडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हीडिओत एक मुलगा आणि मुलगी डान्स करताना दिसत आहेत. मुलगा हा मुलीला डान्सच्या स्टेप्स शिकवत आहे. यामध्ये धावत जाऊन हवेत उडी मारण्याची एक स्टेप आहे. मुलाने मुलीला ही स्टेप समजावून सांगितल्यानंतर ती करायला सांगितली. दोघेजण एकत्र डान्सची स्टेप करायला जातातही. मात्र, हवेत उडी मारण्याच्या नादात मुलीची लाथ मुलाला बसते. त्यामुळे डान्स स्टेप्स शिकवणार मुलगा फेकला जातो. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. tube.indian या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून 46 हजारपेक्षा जास्त लोकांनी तो लाईकही केला आहे.


संबंधित बातम्या:

Video : वधू-वराकडून स्टेजवर पुश-अप; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धमाकेदार प्रतिक्रिया, हा व्हिडीओ पाहाच

Video : दोन वृद्ध एकमेकांना भिडले, त्यांचा जोश पाहून तुम्हीही थक्क व्हाल; पुढे काय झालं तुम्हीच पाहा!

Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !