Video : वधू-वराकडून स्टेजवर पुश-अप; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धमाकेदार प्रतिक्रिया, हा व्हिडीओ पाहाच

या जोडप्याने त्यांच्या लग्नात सात फेरे तर घेतलेच मात्र स्टेजवर चक्क पुशअप सुद्धा केले आहेत! (Push-up on stage by the bride and groom; Netizens' amazing reaction to the viral video, watch this video)

Video : वधू-वराकडून स्टेजवर पुश-अप; व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या धमाकेदार प्रतिक्रिया, हा व्हिडीओ पाहाच

मुंबई : सध्या प्रत्येकालाच आपल्या लग्नासाठी (Wedding) काहीतरी खास करायचं असतं. यासाठी अनेक वेळा लोक असं कृत्य करतात, जे पाहून संपूर्ण जग थक्क होतं. (Viral Video) आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे, या जोडप्याने त्यांच्या लग्नात सात फेरे तर घेतलेच मात्र स्टेजवर चक्क पुशअप सुद्धा केले आहेत!

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर पुश-अप करताना दिसत आहेत. ही क्लिप बघून असं वाटतंय की ते प्रत्येकाला आपल्या वैवाहिक जीवनात नेहमी फिट राहण्याचा संदेश देत आहे. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे व्हायरल गाणं बचपन का प्यार या व्हिडीओसह वाजवलं जात आहे, जे लोकांना खूप आवडलेलं आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमधील सर्वात गंमतीची गोष्ट म्हणजे व्हायरल गाणं ‘बसपन का प्यार’ या व्हिडीओसोबत वाजत आहे, जे आधीच लोकांना खूप आवडलेलं आहे. सोशल मीडियावर लोकांना मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ आवडत आहे. हेच कारण आहे की अनेक वापरकर्त्यांनी व्हिडीओवर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. एका वापरकर्त्यानं लिहिलं की हे दृश्य खरोखर नेत्रदीपक आहे. दुसरीकडे, दुसऱ्या एका वापरकर्त्यानं लिहिलं की लग्नात हे कोण करतं, भाऊ! या व्यतिरिक्त, इतर अनेक वापरकर्त्यांनी या जोडप्याचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केलं आहे.

अक्षिता अरोरा नावाच्या वापरकर्त्यानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत सुमारे 60 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. काही लोकांना हे कपल खूप आवडलं आहे. तर काही लोक म्हणालेत की लग्नाच्या निमित्तानं असे विनोद करणं चुकीचं आहे.

संबंधित बातम्या

Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !

Video | ‘बुलेट बंदी’ गाण्यावर नर्स थिरकली, भन्नाट डान्सवर नेटिझन्स फिदा

Video | सुंदर काश्मिरी नवरीचा न्याराच थाट, कार चालवत निघाली सासरला, व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI