Video | ‘बुलेट बंदी’ गाण्यावर नर्स थिरकली, भन्नाट डान्सवर नेटिझन्स फिदा

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तेलंगाना राज्यातील राजन्ना सिरिसिला जिल्ह्यातील एक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आहे. या दवाखान्यात आरामची वेळ असल्यामुळे विरंगुळा म्हणून काही नर्स बसलेल्य़ा आहेत. यावेळी एक नर्स बाकीच्या नर्सेससमोर डान्स करत आहे. ही नर्स ‘बुलेट बंदी’ या गाण्यावर थिरकत आहे.

Video | 'बुलेट बंदी' गाण्यावर नर्स थिरकली, भन्नाट डान्सवर नेटिझन्स फिदा
nurse dance viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या तर एक अतिशय मेजदार असा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये एक नर्स ‘बुलेट बंदी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आवडीने पाहिला जातोय. (Telangana hospital nurse dancing on bullet bandi song video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला व्हिडीओ तेलंगाना राज्यातील राजन्ना सिरिसिला जिल्ह्यातील एक प्राथमिक आरोग्य केंद्रातील आहे. या दवाखान्यात आरामची वेळ असल्यामुळे विरंगुळा म्हणून काही नर्स बसलेल्य़ा आहेत. यावेळी एक नर्स बाकीच्या नर्सेससमोर डान्स करत आहे. ही नर्स ‘बुलेट बंदी’ या गाण्यावर थिरकत आहे. नर्स डान्स करत असल्याचे पाहून तिच्या सहकारी नर्सेस चांगल्याच खूश झाल्या आहेत. या नर्स डान्स करत असलेल्या नर्सला टाळ्या वाजून प्रोत्साहित करत आहेत. काही नर्स तर चक्क व्हिडीओ रेकॉर्ड करतायत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नर्सचा हा डान्स पाहून नेटकरी चांगलेच खूश झाले आहेत. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करत असून त्याला शेअरसुद्धा करत आहेत. Vidya Sagar Gunti नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर येताच हा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Video | सुंदर काश्मिरी नवरीचा न्याराच थाट, कार चालवत निघाली सासरला, व्हिडीओ व्हायरल

Video | आवडीच्या गाण्यासाठी नवरी रुसली, म्हणते मंडपात येणारच नाही, नातेवाईकांची धावपळ

Video | घरात कपलचा रोमान्स, मिठीत घेताच महिला अचानकपणे ओरडली, रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

(Telangana hospital nurse dancing on bullet bandi song video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI