Video | आवडीच्या गाण्यासाठी नवरी रुसली, म्हणते मंडपात येणारच नाही, नातेवाईकांची धावपळ

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक सुंदर नवरी दिसतये. नवरी लग्नमंडपात येत आहे. लग्नविधीसाठी येताना नवरीचा मूड अगदीच फ्रेश आहे. मात्र, मध्येच एक घटना घडली आहे. लग्नमंडपात एन्ट्री मारताना नवरीच्या आवडीचे गाणे न लागल्यामुळे नवरी भलतीच नाराज झाली आहे. नवरी भर मंडपात रुसून बसली आहे.

Video | आवडीच्या गाण्यासाठी नवरी रुसली, म्हणते मंडपात येणारच नाही, नातेवाईकांची धावपळ
BRIDE VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. चर्चेत येणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्न समारंभातील व्हिडीओ तर विशेषत्वाने चर्चिले जातात. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये आवडीचे गाणे न लावल्यामुळे नवरी चांगलीच रुसून बसली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (cute bride get angry refuses to enter in marriage function for favourite song video went viral on social media)

नवरी भर मंडपात रुसून बसली

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक सुंदर नवरी दिसतये. नवरी लग्नमंडपात येत आहे. लग्नविधीसाठी येताना नवरीचा मूड अगदीच फ्रेश आहे. मात्र, मध्येच एक घटना घडली आहे. लग्नमंडपात एन्ट्री मारताना नवरीच्या आवडीचे गाणे न लागल्यामुळे नवरी भलतीच नाराज झाली आहे. नवरी भर मंडपात रुसून बसली आहे. एवढेच नाही तर मनासारखे गाणे लागले तरच मी मंडपात येईल, असा सज्जड दमसुद्धा नवरीने आपल्या नातेवाईकांना दिला आहे.

नातेवाईक नवरीची समजूत काढत आहेत

नवरी नाराज झाल्याचे पाहून सगळीकडे धावपळ उडाली आहे. काही क्षणात नवरीचे नातेवाईक तिच्याकडे आले आहेत. नाराज होऊ नकोस तुझ्या आवडीचे गाणे लावायला सांगतो, असे म्हणत नातेवाईक नवरीची समजूत काढत आहेत. तसेच नवरीचे नातेवाईक डीजेकडे नवरीने सांगितलेले गाणे लावण्याची मागणी करत आहेत. व्हिडीओमध्ये मी आल्यावर कोणते गाणे लावावे हे मी आधीच सांगितलं होतं, असं नवरी नाराज होऊन म्हणत आसल्याचे आपल्याला दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. नवरीच्या रुसण्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडे हशा पिकला आहे. लोक या मजेदार व्हिडीओला पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही लोकांनी तर या व्हिडीओला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर theweddingbrigade या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | छोट्याशा मुलाची अजब करामत, सुपरहिरोची नक्कल करताना फोडला टीव्ही, मजेदार व्हिडीओ व्हायरल

Video | घरात कपलचा रोमान्स, मिठीत घेताच महिला अचानकपणे ओरडली, रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

Video | ‘लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मुर्ख वाटायला लागतो’, मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल

(cute bride get angry refuses to enter in marriage function for favourite song video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI