Video | घरात कपलचा रोमान्स, मिठीत घेताच महिला अचानकपणे ओरडली, रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीडोमध्ये एक क्यूट कपल दिसत आहे. हे कपल त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही हसत हसत घराच्या खिडकीजवळ आले आहेत. खिडकीजवळ येऊन त्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतलंय.

Video | घरात कपलचा रोमान्स, मिठीत घेताच महिला अचानकपणे ओरडली, रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल
COUPLE VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कधी एखादा मजेदार व्हिडीओ समोर येतो. तर कधी एखादा थरारक व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या मात्र आपल्या खळखळून हसायला लावणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रोमान्स करणाऱ्या एका कपलची चांगलीच मज्जा आली आहे. गळाभेट करताना हे कपल अचानकपणे चांगलेच घाबरले आहे. (couple hugging and doing romance women suddenly scream funny video went viral on social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलं ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीडोमध्ये एक क्यूट कपल दिसत आहे. हे कपल त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दोघेही हसत हसत घराच्या खिडकीजवळ आले आहेत. खिडकीजवळ येऊन त्यांनी एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतलंय. तसेच व्हिडीओतील माणसाने समोरच्या महिलेच्या कपाळावर किस केल्याचं दिसतंय. नंतर दोघेही एकमेकांच्या मिठीत आले आहेत. मात्र, मध्येच काहीतरी अजब घडलं आहे. व्हिडीओतील कपल एकमेकांच्या मिठीत येत असताना खालून एका माणसाने भलतंच काम केलं आहे. त्याने खालून एका लाकडाच्या टोकाला बाहुल्याचे डोके लटकवले आहे. नंतर तेच बाहुले त्याने एकमेकांना मिठीत घेणाऱ्या कपलच्या समोर पकडलं आहे.

अंगाचा थरकाप उडवणारे बाहुले समोर आले

कपल आनंदात असताना समोर अचानकपणे थरकाप उडवणारे बाहुले आल्यामुळे व्डिडीओतील महिला चांगलीच घाबरली आहे. नंतर हाच प्रसंग व्हिडीओतील माणसासोबतही घडला आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या कपलसमोर असा भीतीदायक प्रसंग आल्यामुळे सगळेच अवाक् झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Jojo sim (@jojosim)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही लोकांना या व्हिडीओतील कपलची झालेली फजिती पाहून हसू फुटलं आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर jojosim या अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. नेटकरी या व्हिडीओला पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत

इतर बातम्या :

Video | ‘लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मुर्ख वाटायला लागतो’, मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल

Video | भर रस्त्यावर आला 10 फुटांचा अजगर, भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचं पुढे काय झालं ?

Video | फटाके हातात घेऊन नाचणे अंगलट, माणसाच्या एका चुकीमुळे जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा, व्हिडीओ व्हायरल

(couple hugging and doing romance women suddenly scream funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI