Video | भर रस्त्यावर आला 10 फुटांचा अजगर, भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचं पुढे काय झालं ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महाकाय अजगर दिसत आहे. हा अजगर वाहनांची ये-जा सुरु असताना भर रस्त्यात आला आहे. तसेच कशाचीही पर्वा न करता तो रस्ता ओलांडत आहे. हा अजगर रस्त्यावर अचानकपणे आल्यामुळे सगळेच लोक गोंधळे आहेत.

Video | भर रस्त्यावर आला 10 फुटांचा अजगर, भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचं पुढे काय झालं ?
SNAKE VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपल्याला हसू फुटते. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ एका महाकाय अजगराचा आहे. हा अजगर पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अजगराच्या धाडसाला तसेच त्याच्या महाकाय शरीराला पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (anaconda crossing road in brazil video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक 10 फुटांचा मोठा अजगर दिसत आहे. हा अजगर वाहनांची ये-जा सुरु असताना भर रस्त्यात आला आहे. तसेच कशाचीही पर्वा न करता तो रस्ता ओलांडत आहे. हा अजगर रस्त्यावर अचानकपणे आल्यामुळे सगळेच लोक गोंधळे आहेत. रस्त्यावर लोकांनी पटापट गाड्या थांबवल्या आहेत. तसेच प्रवासी अजगर जाण्याची वाट पाहत आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

अजगराला पाहून लोकांनी वाहने थांबवली

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अजगराला पाहण्यासाठी लोक गर्दी करत असल्याचे दिसतेय. काही लोक तर अजगरासोबत चक्क फोटो काढण्यामध्ये गुंतले आहेत. यामध्ये एका माणसाने आपले वाहन थांबवत कारमधून जाणाऱ्या लोकांना थांबण्यास सांगितले आहे. लोकांनीही हजरजबाबीपणा दाखवत आपली वाहने उभी केली आहेत. तसेच अजगराला जाऊ दिले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अजगराची ही सगळी दहशत कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. लोक हा व्हिडीओ पाहून थक्क होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ ब्राझीलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या व्हिडीओला वेगवेगळ्या समाजमाध्यमावर शेअर केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | फटाके हातात घेऊन नाचणे अंगलट, माणसाच्या एका चुकीमुळे जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा, व्हिडीओ व्हायरल

चालत्या रेल्वेत मॅनेजरची अमानुष मारहाण, माफीसाठी रेल्वे कर्मचाऱ्याच्या गयावया

दुधासाठी मांजरीने लावली लाडीगोडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटभरून हसाल

(anaconda crossing road in brazil video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI