चालत्या रेल्वेत मॅनेजरची अमानुष मारहाण, माफीसाठी रेल्वे कर्मचाऱ्याच्या गयावया

सोशल मीडियावर काही व्हिडीओ अतशिय भीषण असतात. या भीषण व्हिडीओंना विसरणे कठीण होऊन जाते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा असाच असून तो आसाम राज्यातील गुवाहाटी येथील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनमध्ये पँन्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाराऱ्याला लाथा-बुक्क्या तसेच स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या सामानाने मारले जात आहे.

चालत्या रेल्वेत मॅनेजरची अमानुष मारहाण, माफीसाठी रेल्वे कर्मचाऱ्याच्या गयावया
VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 8:45 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित होतो. तर काही व्हिडीओंना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या मात्र एक अतिशय गंभीर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वेच्या पँन्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण केली जात आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याच्या मॅनेजरनेच त्याला मारहाण केली आहे. (train pantry staff brutally beaten by manager video went viral on social media)

कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

सोशल मीडियावर काही व्हिडीओ अतशिय भीषण असतात. या भीषण व्हिडीओंना विसरणे कठीण होऊन जाते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हासुद्धा असाच असून तो आसाम राज्यातील गुवाहाटी येथील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनमध्ये पँन्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाराऱ्याला लाथा-बुक्क्या तसेच स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या सामानाने मारले जात आहे. कर्मचाऱ्याच्या मॅनेजरने ही मारहाण केली आहे. मारताना कस्टमरसोबत काय केलं आहेस ते सांग ? असा सवाल मॅनेजर कर्मचाऱ्याला विचारताना दिसतोय.

पीडित कर्मचारी माफी मागतोय 

या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये माफ करण्याची विनंती कर्मचारी करत आहे. तर मॅनेजर जोरात मारत असताना तो स्वत:ला वाचवण्यासाठी धडपडत असलेला आपल्याला दिसत आहे. नंतर मारहाणीचे प्रमाण वाढल्यानंतर पीडित कर्मचाऱ्यासोबत काम करणारे इतर सहकारी धावून आले आहेत. इतर कर्मचारी पीडत कर्मचाऱ्याला मारू नका अशी विनवणी करताना दिसत आहेत.

मॅनेजरवर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कर्मचाऱ्याला मारणाऱ्या मॅनेजरवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत. त्यासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.

इतर बातम्या :

छोट्या पडद्यावरून थेट बॉलिवूडमध्ये धडक; जाणून घ्या नुसरत भरूचाची नेटवर्थ

दुधासाठी मांजरीने लावली लाडीगोडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही पोटभरून हसाल

VIDEO | अभ्यास करताना आईच्या दमदाटीमुळे रडून रडून मुलीची वाईट अवस्था, व्हिडिओ पाहिल्यानंतर येते बालपणीची आठवण

(train pantry staff brutally beaten by manager video went viral on social media)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.