Video | ‘लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मुर्ख वाटायला लागतो’, मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल

व्हायरल होत असेल्या व्हिडीओमध्ये एक महिला कविता सादर करत आहे. या कवितेत ती नवरा-बायको यांच्या बदलत जाणाऱ्या भावना दाखवण्यात आलेल्या आहेत. कवितेमध्ये नवरा-बायको एकमेकांना भांडत असतात, त्यामुळे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं कोण म्हणतं ? मिश्किल सवाल या महिलेने केला आहे. तसेच एकदा का लग्न झालं की देवसुद्धा वरून आपल्याकडे पाहत नाही, असेही महिला मजेदार पद्धतीने म्हणत आहे.

Video | 'लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मुर्ख वाटायला लागतो', मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल
VIRAL POEM


मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. यातील काही व्हिडीओ हे पती-पत्नी यांच्यातील भांडण तसेच त्यांच्यातील रुसवा-फुगवा यांच्यावर भाष्य करणारे असतात. कदाचित याच कारणामुळे नवरी-नवरदेव तसेच नवरा-बायको यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर जास्त चर्चिले जातात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ तर अगदीच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने आपल्या कवितेच्या माध्यमातून लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये कोणत्या गोष्टी बदलत जातात हे चपखलपणे सांगितलं आहे. (Marathi women funny poem on marriage and husband wife relation video went viral on social media)

लोकांनी महिलेच्या कवितेला डोक्यावर घेतले

व्हिडीओमध्ये एक मराठमोळी महिला दिसत आहे. मराठी भाषेत ही महिला एका कार्यक्रमात कविता सादर करत आहे. नवरा-बायको यांच्यातील भावबंध या महिलेने कवितेच्या माध्यमातून मजेदार पद्धतीने सांगितले आहेत. विशेष म्हणजे कवितेतील शब्द हे सामान्य माणसाच्या भावनांशी मेळ खाणारे असल्यामुळे लोकांनी या महिलेच्या कवितेला डोक्यावर घेतले आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असेल्या व्हिडीओमध्ये एक महिला कविता सादर करत आहे. या कवितेत नवरा-बायको यांच्यातील बदलत जाणाऱ्या भावना दाखवण्यात आलेल्या आहेत. कवितेमध्ये नवरा-बायको एकमेकांना भांडत असतात, त्यामुळे लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं कोण म्हणतं ? असा मिश्किल सवाल या महिलेने केला आहे. तसेच एकदा का लग्न झालं की देवसुद्धा वरून आपल्याकडे पाहत नाही, असेही महिला मजेदार पद्धतीने म्हणत आहे. लग्नानंतरचे गुलाबी दिवस लग्नांतर संपून जातात, असे ही महिला सांगत आहे. लग्नापूर्वी जो नवरा आपल्याला हुशार वाटतो, नंतर तो भलताच मुर्ख वाटायला लागतो, तसेच बायकोचाही प्रेमळ मुखवटा नंतर हळूहळू फाटायला लागतो, असे भाष्य महिलेने कवितेच्या माध्यमातून केले आहे.

पाहा व्हिडीओ :

कविता सोशल  मीडियावर व्हायरल

दरम्यान, ही मजेदार कविता ऐकून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही नेटकऱ्यांनी नवरा-बायकोंमध्ये असे बदल होत जातात, असं म्हटलंय. तर काही लोकांनी कवितेत सगळं खरंखुरं सांगण्यात आलंय असे भाष्य केले आहे. ही कविता ऐकून काही लोकांना खळखळून हसू फुटले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला यूट्यूबवर अपलोड करण्यात आलंय.

इतर बातम्या :

Video | भर रस्त्यावर आला 10 फुटांचा अजगर, भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचं पुढे काय झालं ?

Video | फटाके हातात घेऊन नाचणे अंगलट, माणसाच्या एका चुकीमुळे जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा, व्हिडीओ व्हायरल

चालत्या रेल्वेत मॅनेजरची अमानुष मारहाण, माफीसाठी रेल्वे कर्मचाऱ्याच्या गयावया

(Marathi women funny poem on marriage and husband wife relation video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI