Video | छोट्याशा मुलाची अजब करामत, सुपरहिरोची नक्कल करताना फोडला टीव्ही, मजेदार व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसत आहे. हे छोटे मुल घरातील टीव्हीवर कार्टून पाहत आहे. कार्टून पाहताना त्याला अतिशय आनंद होतोय. विशेष म्हणजे टीव्हीमधील सुपरमॅन जशी अ‌ॅक्शन करेल अगदी तशीच अ‌ॅक्शन व्हिडीओतील छोटे मुल करत आहे.

Video | छोट्याशा मुलाची अजब करामत, सुपरहिरोची नक्कल करताना फोडला टीव्ही, मजेदार व्हिडीओ व्हायरल
small boy viral video

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय समोर येईल हे सांगता येत नाही. या मंचावर रोजच नवनवे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण थक्क होऊन जातो. सध्या मात्र, एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मुलाने सुपरहिरोची नक्कल करत घरातील टीव्हीची तोडफोड केली आहे. (little boy broke big tv while playing funny video went viral on social media)

छोटे मुल करतेय सुपरमॅनची अॅक्शन

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसत आहे. हे छोटे मुल घरातील टीव्हीवर कार्टून पाहत आहे. कार्टून पाहताना त्याला अतिशय आनंद होतोय. विशेष म्हणजे टीव्हीमधील सुपरमॅन जशी अ‌ॅक्शन करेल अगदी तशीच अ‌ॅक्शन व्हिडीओतील छोटे मुल करत आहे. आनंदात असल्यामुळे आपण काय करत आहोत, याचे भानदेखील त्याला राहिलेले नाही.

खेळण्याच्या नादात टीव्ही फोडला

लहान मुलं म्हटलं की खट्याळपणा, तरतरीतपणा हा आलाच. छोटी मुलं कधी काय करतील हे सांगता येत नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये याचीच प्रचिती आली आहे. या व्हिडीओमध्ये छोटे मुल टीव्हीतील सुपरमॅनची नक्कल करत आहे. नक्कल करताना आपण काय करतोय, याची त्याला कल्पना नाही. व्हिडीओतील छोटे मुल सुपरहिरोसारखी मारामारी करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये त्याने घरातील टीव्ही पूर्ण फोडला आहे. सुरुवातीला या बाळाने टीव्हीवर प्लास्टिकचा स्टूल फेकून मारला आहे. तसेच नंतर घरातील इतर वस्तू बाळ टीव्हीवर फेकून मारत आहे. बाळाचा खेळ त्याच्या पालकांना चांगलाच महागात पडला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या बाळाच्या पालकांना त्याची मस्ती चांगलीच माहागात पडली आहे, अशी कमेंट केली आहे. तर काही लोकांनी या व्हिडीओला अतिशय क्यूट असल्याचे म्हटले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ट्विटरवर @nowthisnews या अकाऊंटवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बामत्या :

Video | घरात कपलचा रोमान्स, मिठीत घेताच महिला अचानकपणे ओरडली, रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

VIDEO : वायू वेगाने रेल्वे फाटक पार करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार पठ्ठ्याचं हाल काय झालं बघाच!

Video | ‘लग्नापूर्वीचा हुशार नवरा भलताच मुर्ख वाटायला लागतो’, मराठमोळ्या महिलेची भन्नाट कविता व्हायरल

(little boy broke big tv while playing funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI