AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सुंदर काश्मिरी नवरीचा न्याराच थाट, कार चालवत निघाली सासरला, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा काश्मीरमधील आहे. नुकतंच लग्न झाल्यामुळे काश्मिरी नवरी आणि नवरदेव त्यांच्या शाही पोषाखात आहेत.

Video | सुंदर काश्मिरी नवरीचा न्याराच थाट, कार चालवत निघाली सासरला, व्हिडीओ व्हायरल
kashmiri bride viral video
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 8:06 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर लग्न समारंभातील अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. लग्नातील गोंधळ, गडबड तसेच नवरी आणि नवरदेव यांच्यात उडालेली धम्माल पाहण्यासारखी असते. सध्या तर एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक काश्मिरी नवरी मोठ्या थाटात कार चालवत आहे. कार चालवत ती आपल्या नवऱ्यासोबत तिच्या सासरला जात आहे. (beautiful Kashmiri bride driving car with his room video went viral on social media)

व्हायरल व्हिडीओ काश्मिरी नवरीचा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा काश्मीरमधील आहे. नुकतंच लग्न झाल्यामुळे काश्मिरी नवरी आणि नवरदेव त्यांच्या शाही पोषाखात आहेत. ते महिंद्रा थारमध्ये बसल्याचे दिसतेय. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारमध्ये ते दोघेच आहे. त्यातही कार खुद्द नवरी चालवत आहे. तर नवरीच्या बाजूला नवरदेव बसला आहे. काश्मिरी नवरीचा हा थाट नेटकऱ्यांना चांगलाच आवडाला आहे.

नवरी दिमाखात कार चालवत आहे

महिंद्रा थार या कारमध्ये बसल्यानंतर व्हिडीओतील नवरी गोड हसत आहे. ती तिच्या नवरदेवासोबत काहीतरी बोलत असल्याचे दिसत आहे. नवरीचा साज आणि तिने केलेला मेकअप पाहून सगळ्यांनाच तिची भुरळ पडलीय. या व्हिडीओमध्ये नवरी थाटात कार चालवत असल्यामुळे नेटकरी थक्क झालेयत. मुळात माहेरी जात असताना नवरी-नवरदेव आरामात बसलेले असतात; तर चालक कार चालवत असतो. मात्र, या व्हिडीओमध्ये खुद्द नवरी ड्रायव्हिंग करत असल्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

काश्मिरी नवरीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ Mantasha Qureshi या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Video | आवडीच्या गाण्यासाठी नवरी रुसली, म्हणते मंडपात येणारच नाही, नातेवाईकांची धावपळ

Video | छोट्याशा मुलाची अजब करामत, सुपरहिरोची नक्कल करताना फोडला टीव्ही, मजेदार व्हिडीओ व्हायरल

VIDEO : वायू वेगाने रेल्वे फाटक पार करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार पठ्ठ्याचं हाल काय झालं बघाच!

(beautiful Kashmiri bride driving car with his room video went viral on social media)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.