कमकुवत हृदय असणाऱ्यांनी व्हिडीओ पाहू नका, रात्री पाहाल तर…..

सध्या असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ शेअर होत असला तरी कमकुवत हृदय असणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहू नये, अशा कमेंटही दिल्या जात आहेत.

कमकुवत हृदय असणाऱ्यांनी व्हिडीओ पाहू नका, रात्री पाहाल तर.....
बुजगावणं
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 11:48 AM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. ट्विटर, फेसबुक, इन्स्टा किंवा यूट्यूबवर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात आणि ते शेअर होत राहतात. सध्या असाच एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ शेअर होत असला तरी कमकुवत हृदय असणाऱ्यांनी हा व्हिडीओ पाहू नये, अशा कमेंटही दिल्या जात आहेत.

नेमका व्हिडीओ काय?

हा व्हिडीओ एका बुजगावण्याचा आहे. शेतातील पिकांवरील पाखरं हाकण्यासाठी हे बुजगावणं उभं केलं आहे. मात्र हे बुजगावणं इतकं भीतीदायक आहे की जर कोणी रात्री पाहिलं तर भीतीने थरकाप उडू शकतो. सर्वसाधारण बुजगावणी स्थिर उभी करुन ठेवलेली असतात. मात्र हे बुजगावणं वेगाने हलणारं, हेलकावे देणारं आणि उड्या मारणारं आहे. त्यामुळे साहजिकच ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांनी त्यांनी हा भीतीदायक असल्याचंच म्हटलं आहे.

हा व्हिडीओ अवघ्या 9 सेकंदांचा आहे. ट्विटरवर @KaptanHindostan या हँडलवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करुन, हलक्या हृदयाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहू नये असंही नमूद केलं आहे. जर कमजोर हृदयाच्या लोकांनी रात्री जर हा व्हिडीओ पाहिला तर काय होईल विचार करा, असंही काही युजर्सनी म्हटलं आहे.

आणखी एक कमेंट

संबंधित बातम्या 

Video | बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त वेग, सोडा बॉटलचे झाकण उघणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल