Video | बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त वेग, सोडा बॉटलचे झाकण उघणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल

सध्या अशाच एका एक्सपर्ट माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्याची काम करण्याची पद्धत ही डोळे दिपवणारी आहे.

Video | बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त वेग, सोडा बॉटलचे झाकण उघणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
soda-bottle viral video

मुंबई : आपल्या देशात टॅलेन्टला कमी नाही. वेगवेगळ्या थक्क करणाऱ्या कला सादर करणारे लोक आपल्याला पावलोपावली भेटतात. काही लोक त्यांच्या कामात एवढे तरबेज असतात की त्यांनी मिळवलेल्या मास्टरीशी कोणीही बरोबरी करु शकत नाही. सध्या अशाच एका एक्सपर्ट माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये त्याची काम करण्याची पद्धत ही डोळे दिपवणारी आहे. (man opening soda bottle with bullet speed video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादीतरी कला असते. याच कलेच्या जोरावर काही लोक प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या असाच एक हुनरबाज माणूस चर्चेत आला आहे. तो लोकांना थंड सोडा तयार करुन देत आहे. त्याच्या कामाची विशेषता म्हणजे हा माणूस एकाच वेळी विस ते तीस जणांना पिण्यासाठी सोडा तयार करत आहे. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे हा माणूस अतिशय वेगामध्ये सोडा बॉटलचे झाकण उघडतो आहे.

एका सेंकदात कित्येक बॉटल्सचे झाकण खोलतोय हा माणूस 

सोडा बॉटलचे झाकण हे अतिशय़ गच्च पद्धतीने लावलेल असते. सहजासहजी हे झाकण उघडत नाही. मात्र हा माणूस एका सेकंदात अशा कित्येक बॉटल्सचे झाकण उघडतोय. त्याच्या काम करण्याच्या या पद्धतीमुळे नेटकऱ्यांचे डोळे दिपले आहेत. एखाद्या बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त वेगाने तो बॉटल्सचे झाकण उघडतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या माणसाचा हा व्हिडीओ त्याच्याकडे आलेल्या एका ग्राहकाने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. सोशल मीडियावर अपलोड करताच या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून त्याला ‘pb_06_aale’ या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | लहान मुलासारखी बकऱ्यांची मस्ती, उतारावर रंगला घसरगुंडीचा खेळ, व्हिडीओ व्हायरल

Video | नको तिथे स्पर्श करताच महिला खवळली, तरुणांची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ पाहाच !

Video | हिमाचल प्रदेशात ढगफुटी, नद्यांना पूर, वाहनेही गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल

(man opening soda bottle with bullet speed video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI