Video | नको तिथे स्पर्श करताच महिला खवळली, तरुणांची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ पाहाच !

ध्या एका महिलेसोबत झालेल्या छेडछाडीचा एक प्रसंग समोर आला आहे. यामध्ये महिलेने टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला आहे.

Video | नको तिथे स्पर्श करताच महिला खवळली, तरुणांची केली चांगलीच धुलाई, व्हिडीओ पाहाच !
WOMEN ASSAULT VIRAL VIDEO

मुंबई : बलात्कार, छेडछाड यासारख्या महिला अत्याचाराच्या अनेक घटना रोजच घडतात. या घटनांमुळे सामाजिक स्वास्थ बिघडतंच पण त्याचबरोबर महिलांना त्यांच्या विकासासाठी योग्य संधीसुद्धा मिळत नाहीत. सध्या एका महिलेसोबत झालेल्या छेडछाडीचा एक प्रसंग समोर आला आहे. यामध्ये महिलेने टवाळखोरांना चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला असून नेटकरी महिलेची प्रशंसा करत आहेत. (women biting young boy who tried to molest her video went viral on social media)

टवळखोर तरुणाकडून महिलेला बॅड टच 

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक महिला सायकलवर प्रवास करताना दिसतेय. यावेळी प्रवास करताना ती एका कारजवळ आली आहे. मात्र, याचवेळी कारमध्ये बसलेल्या एका टवळखोर तरुणाने महिलेला बॅड टच केला आहे. या स्पर्शामुळे महिला चांगलीच खवळली आहे.

महिलेकडून टवाळखोरांची चांगलीच धुलाई

बॅड टचमुळे व्हिडीओतील महिला कारमधील तरुणांवर चांगलीच खवळली आहे. तिने रागात येऊन जवळ असलेली सायकल थेट कारवर फेकली आहे. त्यानंतर कारमधील तरुण हा चांगलाच रागात आला आहे. तो रागात कारमधून बाहेर आल्याचे आपल्याला दिसतेय. मात्र, कारमधून बाहेर येताच या महिलेने त्या तरुणाला जोरात लाथ मारली आहे. तसेच कारमध्ये बसलेल्या दुसऱ्या तरुणालाही तिने अशाच प्रकारे धडा शिकवला आहे. अशा एकूण तीन तरुणांची धुलाई करुन व्हिडीओतील महिलेने टवाळखोरांना चांगलाच अद्दल घडवली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी महिलेची प्रशंसा करत असून प्रत्येक मुलीने असेच धाडस दाखवायला हवे, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा व्हिडीओ नियोजनबद्ध पद्धतीने शूट केल्याचे काही नेटकरी म्हणत आहेत. पण या व्हिडीओमध्ये जो संदेश देण्यात आला आहे, तो अतिशय चांगला असून महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | हिमाचल प्रदेशात ढगफुटी, नद्यांना पूर, वाहनेही गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल

रोटी बनवताना व्हायरल झाला एका सुंदर पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ, जाणून घ्या कोण आहे ही मुलगी?

Video : ‘तेरे इश्क मे नाचेंगे’ गाण्यावर रस्त्यातच धमाकेदार डान्स, पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!

(women biting young boy who tried to molest her video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI