Video | हिमाचल प्रदेशात ढगफुटी, नद्यांना पूर, वाहनेही गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल

ढगफुटीमुळे धर्मशाला परिसरात सगळीकडे पाणीच पाणी साचले असून या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video |  हिमाचल प्रदेशात ढगफुटी, नद्यांना पूर, वाहनेही गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल
dharmshala ACCIDENT

धर्मशाळा :  देश एकीकडे कोरोना महामारीशी दोन हात करतो आहे. तर दुसरीकडे काही नैसर्गिक आपत्तींनाही देशाला तोंड द्यावे लागतेय. सध्या हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला भागात मोठी ढगफुटी झाली आहे. या ढगफुटीमुळे धर्मशाला परिसरात सगळीकडे पाणीच पाणी साचले असून या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धर्मशाला येथे झालेली ही ढगफुटी चकित करणारी आहे. या ढगफुटीमध्ये लोकांच्या घरांचं, वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. (Himachal Pradesh Dharamshala cloudburst video went viral on social media)

dharmshala ACCIDENT

dharmshala ACCIDENT

मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील भागूस नाग परिसरात सोमवारी अचानकपणे ढगफुटी झाली. या घटनेमुळे येथील लोकांच्या घरात पाणी शिरले. तर काही ठिकणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे काही ठिकाणी लोकांच्या कारसुद्धा वाहून गेल्या. या घटनेमुळे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे धर्माशाला परिसर तसेच भागूस या भागात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

 

दरम्यान, ही घटना घडल्यावर सोशल मीडियावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. या घटनेचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या लोकांचे मनोबल वाढावे म्हणून नेटकरी देवाकडे प्रार्थना करत आहेत. ट्विटरवर तर #Dharamshala आणि #cloudburst हे हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहेत.

इतर बातम्या :

रोटी बनवताना व्हायरल झाला एका सुंदर पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ, जाणून घ्या कोण आहे ही मुलगी?

Video : ‘तेरे इश्क मे नाचेंगे’ गाण्यावर रस्त्यातच धमाकेदार डान्स, पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!

Viral : एका व्यक्तीच्या मागे लागला ऊंट, पुन्हा जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही

(Himachal Pradesh Dharamshala cloudburst video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI