मुंबई : सोशल मीडियावर अनेक मजेशिर गोष्टी शेअर केल्या जात आहेत. यातील काही व्हिडीओ पाहून हसू आल्याशिवाय राहत नाही, तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल आणि हसू आल्याशिवाय राहणार नाही. कारण, एक ऊंट एका व्यक्तीला चांगलाच पळवतोय आणि भीतीपोटी त्या व्यक्तीची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळतंय. (Camel chases a man, video goes viral on social media)