Video | बलुचिस्तानमध्ये ‘तेरी मिट्टी’ गाण्याचा बोलबाला, अली बुगाटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 11, 2021 | 7:13 PM

सध्या मात्र, भारत देशातील एक गीत पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. हे गीत येथील बलुचिस्तान प्रांतात आवडीने गायलं जातंय.

Video | बलुचिस्तानमध्ये 'तेरी मिट्टी' गाण्याचा बोलबाला, अली बुगाटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
teri mitti song viral video
Follow us

मुंबई : सोशल मीडियाला भाषा तसेच देशाच्या सीमेचा अडसर नसतो. या माध्यामतून आपण जगभरातील कोणाशीही संपर्क साधू शकतो. याच कारणामुळे आपल्याकडे इंग्रजी तसेच इतर विदेशी गाणे चर्चेच येतात. सध्या मात्र, भारत देशातील एक गीत पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. हे गीत येथील बलुचिस्तान प्रांतात आवडीने गायलं जातंय. याच गाण्याचा बलुचिस्तानमधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. (Pakistan Balochistan singar Wahab Ali Bugti sung song of bollywood Akshay Kumar acted Keshari film Teri Mitti song video went viral on social media)

‘तेरी मिट्टी’ गाण्याचा बलुचिस्तानमध्ये बोलबाला

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा बलुचिस्तान प्रांतातील आहे. येथील गायक वहाब अली बुगाटी यांनी अक्षय कुमारने अभिनय केलेल्या केशरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणे गायलं आहे. त्यांनी गायलेलं हे गीत नेटकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवडत आहे. तेरी मिट्टी हे गीत बुगाटी यांनी गायल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय नेटकरीसुद्धा हे गीत ऐकून मंत्रमुग्ध झाले असून बुगाटी यांची वाहवा करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ Fazila Baloch यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला असून त्याला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत.

इतर बातम्या :

Video | वाहनांच्या गर्दीमध्ये बिबट्या ठाण मांडून बसला, शेवटी घेतलेली झेप एकदा पाहाच !

Video | अर्धनग्नावस्थेत चर्चवर चढला, आग लावण्याचा प्रयत्न, नंतर पोलिसांनी काय केलं ? पाहा व्हिडीओ

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा

(Pakistan Balochistan singar Wahab Ali Bugti sung song of bollywood Akshay Kumar acted Keshari film Teri Mitti song video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI