AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा

लग्नमंडपात राडा करतेवेळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही तरुणी लग्नमंडपाच्या गेटवर जाऊन बाबू- शोना असे जोरजोरात किंचाळून बॉयफ्रेंडला हाकाही मारत होती.

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा
Girlfriend Keep Shouting outside boyfriend marriage
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 9:59 AM
Share

मुंबई : रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका तरुणाने गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न केल्याने तिने भर मंडपात जाऊन राडा घातल्याची घटना समोर आली आहे. लग्नमंडपात राडा करतेवेळीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही तरुणी लग्नमंडपाच्या गेटवर जाऊन बाबू- शोना असे जोरजोरात किंचाळून बॉयफ्रेंडला हाकाही मारत होती. तसेच तिने लग्न मंडपात घुसून ते लग्न थांबवण्याचा प्रयत्नही करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. (Girlfriend Keep Shouting for Babu Shona Outside Marriage Hall during Lover wedding Video Viral)

लग्नाच्या गेटवर थेट राडा 

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडीओ मध्यप्रदेशमधील होशंगाबाद येथील आहे. हे कपल तीन वर्ष लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. दोघेही भोपालच्या एका कंपनीमध्ये काम करत होते. ते तीन वर्ष एकत्र राहून तिच्या बॉयफ्रेंडने न सांगता गुपचूप लग्न केले. या लग्नाची बातमी त्या तरुणीला कळताच तिने थेट लग्नमंडप गाठलं.

यानंतर ती लग्नमंडपाच्या गेटवर जाऊन बाबू-शोना करुन ही तरुणी बॉयफ्रेंडला जोरजोरात हाका मारत होती. तसेच तिने लग्नमंडपाचे गेटही जोरजोरात वाजवले. त्या ठिकाणाहून ती तिच्या बॉयफ्रेंडला आवाज देत होती. काहीही करुन हे लग्न थांबावावे, असे तिला वाटत होते. मात्र बाहेर उपस्थितीत असलेल्यांपैकी कोणीही तिला साथ दिली नाही.

व्हिडीओ तुफान व्हायरल

ती लग्न थांबवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न करताना दिसत आहे. ती गेटमधून आत जाण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र तिथे उभ्या असलेल्या सेक्युरिटी गार्डने देखील या तरुणीला आत सोडले नाही. या तरुणीचा हा ड्रामा अर्धा तास सुरु होता. सध्या सोशल मीडियावर या तरुणीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास नकार 

हा सर्व ड्रामा सुरु असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणीला गाडीत बसवून पोलिस ठाण्यात आणले आणि हा सर्व प्रकार काय? याची विचारपूस केली. यानंतर पोलिसांनी याबद्दल तक्रार दाखल करायची का? असे विचारले. मात्र तिने तक्रार दाखल करण्यास नकार दिला आणि घर गाठले.  तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

(Girlfriend Keep Shouting for Babu Shona Outside Marriage Hall during Lover wedding Video Viral)

संबंधित बातम्या : 

Video | भर मंडपात मित्राने दिलं भलतंच गिफ्ट, नजर टाकताच नवरी लाजली, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | लग्नाआधी नवरी-नवरदेवाने केलं ‘हे’ काम, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ऐकावे ते नवलच! वधूच्या डोक्यावर तोडले जातात पापड, पहा या अनोख्या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.