Video | लग्नाआधी नवरी-नवरदेवाने केलं ‘हे’ काम, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा असाच एका लग्न समारंभातील आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत.

Video | लग्नाआधी नवरी-नवरदेवाने केलं 'हे' काम, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
bride groom viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच विविध प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील नवरी तसेच नवरदेव किंवा लग्न समारंभातील व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहिले जातात. लग्नादरम्यान उडालेली धम्माल तसेच नवरी-नवरदेवांची फजिती दाखवलेली असल्यामुळेच हे व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा असाच एका लग्न समारंभातील आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. (bride and groom eating food while marriage video went viral on social media)

नव्या जोडीचा जेवणावर ताव

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरी बसलेले आहेत. हे दोघेही ड्रेसिंग आणि मेकअप करुन तयार आहेत. मात्र, लग्नाआधी या दोघांनाही चांगलीच भूक लागली आहे. याच कारणामुळे त्यांनी लग्नाचा कोणताही विचार न करता थेट जेवणावर ताव मारला आहे. ते दोघेही मस्तपैकी जेवण करत आहेत. या वेळी ही नवी जोडी जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेत असून कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीये.

“लग्न होईल आधी जेवण करुयात”

या व्हिडीओमध्ये नवरी-नवरदेवांना कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली जेवणाची प्लेट दिली आहे. चविष्ट पदार्थांनी भरलेली प्लेट पाहून नवरीला चांगलाच आनंद झाला आहे. जेवण दिसताक्षणी ही नवरी त्यावर तुटून पडली आहे. तसेच यावेळी जेवत असताना नवरीला तिच्या मेअकपचीसुद्धा चिंता राहिलेली नाही. खरं सांगायचं म्हटलं तर हे जेवण पाहून मला माझ्या मेकअपचीसुद्धा काळजी उरलेली नाही, असे ती उत्साहात म्हणत आहे. तशीच स्थिती नवरदेवाचीसुद्धा आहे. लग्न वगैरे होत राहील पण त्याआधी जेवण करु घेऊ, असे हा नवरदेव म्हणतो आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवरी-नवरदेवांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या व्हिडीओला Dulhaniyaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | चिमुकल्याच्या डान्सने उडवली धम्माल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO | भरधाव कारवर जेव्हा अजगर उडी घेतो तेव्हा… ; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

शेवटी सिंहिणसुद्धा एक आई असते; हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणाल ‘माँ, तुझे सलाम’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI