AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | वाहनांच्या गर्दीमध्ये बिबट्या ठाण मांडून बसला, शेवटी घेतलेली झेप एकदा पाहाच !

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ एका हिंस्र प्राण्याचा म्हणजेच एका बिबट्याचा आहे. हा बिबट्या थेट मानवी वस्तीत शिरला असून तो रस्त्यावर बसलेला दिसतोय.

Video | वाहनांच्या गर्दीमध्ये बिबट्या ठाण मांडून बसला, शेवटी घेतलेली झेप एकदा पाहाच !
नाशिकमध्ये वडगाव परिसरात बिबट्याला पकडण्यात आले.
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 4:34 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील मोजकेच व्हिडीओ हे व्हायरल होतात. प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर आवडीने पाहिले जातात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ एका हिंस्र प्राण्याचा म्हणजेच एका बिबट्याचा आहे. हा बिबट्या थेट मानवी वस्तीत शिरला असून तो रस्त्यावर बसलेला दिसतोय. (angry Leopard came on highway video went viral on social media)

जंगलातून बिबट्या थेट रस्त्यावर आला

विकास आणि वाढत्या शहरीकणाच्या हव्यासापोटी माणसाने जंगले नष्ट केली. आपण रोज शेकडो झाडांची कत्तल करतो. याच कारणामुळे आता जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. सध्या दिसणाऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये तर एक बिबट्या थेट रस्त्यावर आला आहे. रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक बिबट्या दिसतोय. हा बिबट्या थेट सस्त्यावर आला असून त्याने फुटपाथवर ठाण मांडले आहे. तो धावून धावून दमल्याचे दिसत आहे. वाहनांची गर्दी असूनही तो रस्त्यावर बसल्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच तो हल्ला तर करणार नाही ना ? या शंकेपोटी प्रवाशांमध्ये अस्वस्थता दिसू लागली आहे. थोडा वेळ फुटपाथवर बसल्यानंतर त्याने झेप घेतल्याचा आपल्याला दिसतेय. झेप घेऊन तो मागच्या जंगलात पळून गेला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत. माणसांनी प्राण्यांचा अधिवास नष्ट केल्यामुळे प्राण्यांवर ही वेळ आल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर काही लोकांना वाघाने घेतलेली झेप चांगलीच आवडली आहे. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | अर्धनग्नावस्थेत चर्चवर चढाला, आग लावण्याचा प्रयत्न, नंतर पोलिसांनी काय केलं ? पाहा व्हिडीओ

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा

Video | भर मंडपात मित्राने दिलं भलतंच गिफ्ट, नजर टाकताच नवरी लाजली, व्हिडीओ एकदा पाहाच

(angry leopard came on highway video went viral on social media)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.