AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मित्राच्या लग्नात डान्सच्या माध्यमातून लावली स्टेजवर आग! तरुणांनी ओढणी घेत केला जबरदस्त डान्स

लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल. लग्नात सहभागी झालेल्या मित्रांच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Video : मित्राच्या लग्नात डान्सच्या माध्यमातून लावली स्टेजवर आग! तरुणांनी ओढणी घेत केला जबरदस्त डान्स
Dance Video
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 12, 2021 | 12:47 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर सध्या लग्न समारंभातील व्हिडीओचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. कधी नवरा-नवरीचे व्हिडिओ तर कधी लग्नात सहभागी मित्रमंडळींचा धकामेदार डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न समारंभातील असे व्हिडीओ तुम्ही हसून हसून लोटपोट होत असाल. लग्नात सहभागी झालेल्या मित्रांच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Dance video of a youngsters at a friend’s wedding goes viral)

आपल्या एखाद्या मित्राचं लग्न असेल तर त्याच्या मित्रांची एक्साईटमेंड एकदम हाय लेव्हलवर असते. लग्नाची तारीख निश्चित होताच सर्व मित्र तयारी सुरु करतात. कपड्यांपासून डान्स परफॉरमन्सपर्यंत सगळं निश्चित केलं जातं. सर्व मित्र एकत्र लग्नात पोहोचतात. तिथं ते आपल्या मित्रासाठी खास डान्स सादर करतात. अशाच एका लग्नातील डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

काही मुलं स्टेजवर पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट घालून स्टेजवर डान्स करताना एका व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांनी आपल्या डोक्यावर ओढणी घेतलेली आहे. ही मुलं करन-अर्जुन चित्रपटातील प्रसिद्ध “मुझको राणा जी माफ करना” या गाण्यावर डान्स करत आहेत. त्यांचा डान्स परफॉरमन्स जोरदार आहे. या मुलांचे डान्स मूव्ह्स लोकांच्या पसंतीला उतरत आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ weddingmomentslove नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 28 हजारापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालतोय. लोक हा व्हिडीओ शेअरही करत आहेत. इतकंच नाही तर या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येत आहेत. हा व्हिडीओ लोकांसाठी मनोरंजन ठरत आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO | अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, गर्लफ्रेंडला न सांगता गुपचूप लग्न, बाबू-शोना करत तरुणीचा थेट लग्नाच्या मंडपाबाहेरच राडा

Video | भर मंडपात मित्राने दिलं भलतंच गिफ्ट, नजर टाकताच नवरी लाजली, व्हिडीओ एकदा पाहाच

Dance video of a youngsters at a friend’s wedding goes viral on social media

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ