VIDEO : पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंत चढण्याचा प्रयत्न, या प्राण्याचे कारनामे पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 

आई ही आई असते, मग ती माणसाची किंवा प्राण्याची आई असो. आईच्या प्रेमापुढे जगातील प्रत्येक प्रेम लहान आहे. आई आपल्या मुलांच्या फायद्यासाठी प्रत्येक वेदना सहन करण्यास तयार असते.h

VIDEO : पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंत चढण्याचा प्रयत्न, या प्राण्याचे कारनामे पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 
व्हायरल व्हिडीओ

मुंबई : आई ही आई असते, मग ती माणसाची किंवा प्राण्याची आई असो. आईच्या प्रेमापुढे जगातील प्रत्येक प्रेम लहान आहे. आई आपल्या मुलांच्या फायद्यासाठी प्रत्येक वेदना सहन करण्यास तयार असते. आपल्या आयुष्यामधील आनंदाची आणि दु: खाची काळजी न घेताही आई आपल्या मुलांच्या सांत्वन आणि आनंदाची काळजी घेते. इंटरनेटवर प्राण्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. (viral video of mother opossum with 5 babies)

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाठीवर सहा पिल्लांना घेऊन भिंती वरून opossum आई चालण्याचा प्रयत्न करते आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. IFS सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यांच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कधीकधी मातृत्वाची शक्ती निसर्गाच्या नियमापेक्षाही जास्त असते.

या आई Opossum ने आपल्या पाठीवर 5 मुलांना घेऊन फिरत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना आवडला आहे. हा व्हिडीओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. लोक म्हणत आहेत की, माणूस असो वा प्राणी, प्रत्येक आईसाठी तिची मुलं आयुष्यापेक्षा अधिक प्रिय असतात.

संबंधित बातम्या : 

Himachal Landslide : आयुष्यातील सुंदर प्रवासानं केला घात, सोलो ट्रीपवर गेलेल्या डॉक्टरचं शेवटचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल

Video | बॉसने फटकारलं म्हणून तरुणी चिडली, थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न, थरारक व्हिडीओ व्हायरल

Video | सांगलीत पुरामुळे घरं नेस्तनाबूत, झाडं उन्मळून पडली, मगरही आली रस्त्यावर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(viral video of mother opossum with 5 babies)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI