‘श्री औरत चालिसा’ शाळेतल्या मुलांचा व्हिडीओ, शिक्षकांवर टीका, संमिश्र प्रतिक्रिया!

| Updated on: Dec 02, 2022 | 4:29 PM

या व्हिडीओमध्ये दोन मुलं शाळेतच महिला शिक्षकांसमोर 'श्री औरत चालिसा'  म्हणताना दिसतायत.

श्री औरत चालिसा शाळेतल्या मुलांचा व्हिडीओ, शिक्षकांवर टीका, संमिश्र प्रतिक्रिया!
shri aurat chalisa
Image Credit source: Social Media
Follow us on

शाळा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित व्हिडिओही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सर किंवा मॅडमच्या शिकवण्याच्या पद्धती लोकांना आश्चर्यचकित करतात. तसे पाहिले तर प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. विशेष म्हणजे मुलांनाही अशाच प्रकारे अभ्यासाचा आनंद मिळतो. तसं पाहिलं तर मुलं शाळांमध्ये अभ्यासाशी संबंधित अनेक गोष्टी शिकतात. हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून आणि ऐकल्यानंतर तुम्ही खूप हसाल.

या व्हिडीओमध्ये दोन मुलं शाळेतच महिला शिक्षकांसमोर ‘श्री औरत चालिसा’  म्हणताना दिसतायत. हनुमान चालीसा किंवा दुर्गा चालिसा तुम्ही ऐकल्या असतील, पण क्वचितच ‘औरत चालिसा’ ऐकल्या असतील.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुलं वर्गात उभी राहून महिला शिक्षकांसमोर ‘औरत चालिसा’ पठण करत आहेत. मुलांची ही चालिसा ऐकल्यानंतर मॅडमही खूप हसताना दिसतात.

या औरत चालिसा मध्ये या मुलांनी महिलांचं वर्णन केलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोमाने व्हायरल होतोय. हा ‘औरत चालिसा’ व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @KhadedaHobe नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सुनियेगा पेश है ‘श्री औरत चालिसा’.

अवघ्या एका मिनिटाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 9 हजारहून अधिक लोकांनीही या व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहून लोकांनी विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मात्र काही लोक या व्हिडिओवर टीकाही करत आहेत.