Video: आकाश भेदणाऱ्या गरुडाला कधी पोहताना पाहिलंय? गरुडाची आणखी एक कला दाखवणारा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाल्ड गरुड माणसाप्रमाणे पोहताना दिसत आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, हा गरुड माणसांसारखाच पोहत आहे, त्याचे पंख तो हाताप्रमाणे वापरत आहे.

Video: आकाश भेदणाऱ्या गरुडाला कधी पोहताना पाहिलंय? गरुडाची आणखी एक कला दाखवणारा व्हिडीओ
नदीत माणसांप्रमाणे पोहणारा गरुड
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 6:36 PM

तुम्ही कधी गरुड पक्ष्याला नदीत पोहताना पाहिले आहे का? ते सुद्धा माणसांप्रमाणे.. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर आता बघा. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहिला जात आहे, ज्यात एक बाल्ड ईगल पंख पसरवून माणसासारखा नदीत तरंगताना दिसत आहे. सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडतो. (Viral Video shows Bald Eagle Swimming like a Human in the river)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बाल्ड गरुड माणसाप्रमाणे पोहताना दिसत आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे, हा गरुड माणसांसारखाच पोहत आहे, त्याचे पंख तो हाताप्रमाणे वापरत आहे. हा व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, गरुडाने पोहून लांबचा प्रवास केला असावा.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

व्हिडिओच्या शेवटी दिसतं की, या गरुडाने नदीत एका माशाची शिकार केली होती. जो तो आपल्या पंजात पकडतो आणि पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचतो. यानंतर नदीच्या काठावरील खडकावर नेऊन तो त्याचा फडशा पाडतो

बाल्ड ईगलचा हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, हा व्हिडिओ अलास्कामधील आहे, जिथं एक बाल्ड गरुड आपल्या पंखांच्या मदतीने नदीत पोहत आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलं आहे. ही संख्या सतत वाढत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतांश युजर्सनी इमोजीज वापरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: धरणाच्या सरळ भिंतीवर चढणाऱ्या, धावणाऱ्या शेळ्या, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ

Video: मालकाच्या आदेशावर हवं ते करणारा कोंबडा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, असे कोंबडे घरोघरी हवे!