जेवताना घशात अन्न अडकलं, जीव गुदमरला, हॉटेल कर्मचाऱ्याने जागेवर उपचार केले! व्हिडीओ व्हायरल

हा चमत्कार वाटतो कारण असं काही होऊ शकतं याचा विचारही आपण करू शकत नाही.

जेवताना घशात अन्न अडकलं, जीव गुदमरला, हॉटेल कर्मचाऱ्याने जागेवर उपचार केले! व्हिडीओ व्हायरल
waitress saved customer
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 14, 2022 | 4:57 PM

अनेकदा आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा तिथे एखादी धक्कादायकी घटना घडते. असंच एक प्रकरण समोर आलंय, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हॉटेलमध्ये बसून जेवत असल्याचं पाहायला मिळतंय. जेवत असतानाच त्याच्या घशात अन्न अडकते आणि त्याला त्रास होऊ लागतो. त्याला पाहून आजूबाजूचे लोक घाबरतात, पण एक चमत्कार होतो. हॉटेल मधली एक महिला कर्मचारी त्याची मदत करते. हा चमत्कार वाटतो कारण असं काही होऊ शकतं याचा विचारही आपण करू शकत नाही.

खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की, रेस्टॉरंट मध्ये
काही लोक टेबलाच्या जेवतायत.

या दरम्यान त्या व्यक्तीच्या घशात अन्न अडकतं, त्याला गुदमरू लागतं. यानंतर त्याला वाईट त्रास होऊ लागतो आणि तो बेशुद्ध होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होते.

त्याचवेळी एक महिला कर्मचारी दुसऱ्या टेबलवर दुसऱ्या ग्राहकाला जेवण देण्यासाठी येते. या ग्राहकाला त्रास होत असल्याचे पाहून ती त्याला मागून पकडते.

ही कसली तरी टेकनिक, काहीतरी उपाय असल्याचं बघणाऱ्याला जाणवतं. ती ग्राहकाला मागून पकडते आणि त्याला झटका देते, पाठीवर थाप देते. लगेचच ग्राहक नीट होतो, यालाच हेमलिच उपचार म्हणतात.