Video : खेळता -खेळता चिमुकल्यानं घरात आणली अशी वस्तू, अख्ख्या कुटुंबाला फुटला घाम, उडाला थरकाप

सोशल मीडियावर दररोज काही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Video : खेळता -खेळता चिमुकल्यानं घरात आणली अशी वस्तू, अख्ख्या कुटुंबाला फुटला घाम, उडाला थरकाप
Image Credit source: activitiesfortoddler, इन्स्टाग्राम
| Updated on: Jul 20, 2025 | 2:49 PM

सोशल मीडियावर दररोज काही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक लहान चिमुकल्यानं आपल्या हातात साप पकडल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ एवढा धक्कादायक आहे की, व्हिडीओ पाहाताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. लोकांना विश्वास बसत नाही की, एवढा लहान मुलगा हातात सापाला कसं पकडू शकतो? या मुलानं सापला फक्त पकडलंच नाही तर तो त्याच्यासोबत खेळताना देखील दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक मुलगा खेळण्यासाठी बाहेर जात आहे, मात्र बाहेरून घरात आल्यानंतर त्याने आपल्या हातात पकडून एक काळा साप देखील आणला आहे, आणि तो त्याच्या कुटुंबाला तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चिमुकल्याच्या हातात साप पाहून घरच्यांना देखील प्रचंड धक्का बसतो, कुटुंबातील सदस्य प्रचंड घाबरले. त्याच्या हातातून सापाची सुटका करण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यानंतर याच चिमुकल्याच्या कुटुंबातील एक सदस्य या चिमुकल्याच्या हाताला धरून बाहेर घेऊन जातो, कारण साप जर घरात पडला असता तर तो घरात घुसण्याची भीती होती, विशेष म्हणजे या सापाने या चिमुकल्याला कोणतीही इजा पोहोचवलेली नाहीये.

 

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजरच्या समिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही लोक हा व्हिडीओ पाहून या चिमुकल्याचं त्याच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. तर काही जणांनी या व्हिडीओवरून या मुलाच्या आई-वडिलांवर टीका केली आहे. मुलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.एका युजरने मजेदार कमेंट करताना पोस्ट केली आहे की, जर तुम्हाला तुमच्या घरातून पाहुण्यांना घालवायचं असेल तर या मुलानं केलेली युक्ती कामी येऊ शकते. तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, कॅमेरामननं या मुलाला का वाचवलं नाही, मुलाच्या जीवापेक्षा व्हिडीओ महत्त्वाचा आहे का? असा सवाल त्याने केला आहे. तर तिसऱ्या युजरने म्हटलं आहे की, या मुलानं सापाची दहशतच संपूण टाकली आहे.