
मुंबई : आपण नेहमीच्या साध्या वाटाणाऱ्या गोष्टींना जास्त भाव देत नाही, किंवा त्या गोष्टी अशाच का असा आपल्याला प्रश्न पडला तरी आपण त्याची उत्तरे शोधत नाहीत. परंतू तिच साधी गोष्ट जर आपल्या विचारली तर आपल्याला त्याचे उत्तर देखील येत नाही. आपण नेहमी ट्रेनच्या डब्यामागे पिवळ्या रंगाचा क्रॉस केलेला पाहत असतो. आपण महिलांच्या शर्टची बटणे उलट बाजूला पहात असतो. मात्र असे का याचा आपण कधीच विचार करीत नाही ? या प्रत्येक गोष्टीला काही विशेष कारणे असतात..ती नेमकी काय ते पाहूया
ट्रेनच्या मागच्या डब्याला पिवळा क्रॉस का ?
रेल्वेत सर्वात शेवटच्या डब्यांच्या मागे पिवळा क्रॉस केलेला आपण पाहतो. हा क्रॉस यासाठी केलेला असतो की तो डब्बा त्या ट्रेनचा शेवटचा डब्बा आहे हे कळावे. स्थानकावर तैनात स्टेशन मास्तरना कळण्यासाठी अशी सोय केलेली असते. जर शेवटच्या डब्या मागे क्रॉस नसेल तर स्टेनल मास्तराला समजते की गाडीचे डब्बे मागे सोडून गाडी पुढे निघून आली आहे. त्यामुळे ट्रेन आपले सर्व डब्बे घेऊन प्रवास करीत आहे, हे कळण्यासाठी हे निशाण असते.
फुल शर्टच्या मनगटाजवळ दोन बटणे का ?
याबाबत मनगटाजवळ शर्ट लुझ करण्यासाठी मनगटाजवळ दोन बटणे लावलेली असतात. काही वेळा उजव्या हातात घड्याळ घातलेले असल्यास ते दिसावे यासाठी देखील दोन बटणे असतात. त्यामुळे मनगडी घड्याळ दिसण्यास मदत होते.
महिलांच्या शर्टला डाव्या बाजूला बटणे का?
महिलांना त्यांच्या मुलांना दूध पाजता यावे यासाठी सोय असते. कारण महिला त्यांच्या मुलाला डाव्या हातानी उचलत असतात. त्यामुळे त्यांनी स्तनापान करताना त्यांना काही अडचण येऊ नये यासाठी ही सोय असते. तसेच असेही सांगितले जाते की प्राचीन काळी महिला घोडेस्वारी करायच्या तेव्हा त्या त्यांच्या सोयीसाठी शर्ट परिधान करायच्या जेव्हा वाऱ्याने बटणे खूलु नयेत यासाठी महिलांच्या शर्टला डाव्या बाजूला बटणे असतात.
फसवणूक करणाऱ्याला 420 का म्हणतात?
जेव्हा कोणी आपली फसवणूक करते तेव्हा आपण त्याला 420 असे म्हणतो. कारण भारतीय दंड विधान संहितेतील ते एक कलम आहे. अशा विविध गुन्ह्यासाठी विविध प्रकारची कलमे नोंदवण्यात आली आहेत. फसवणूकीसाठी 420 कलम असते. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यालाच 420 असे नाव पडले अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.