गोल पिझ्झाच्या डब्याचा आकार चौकोनी का असतो? तुम्ही केला का कधी विचार?

तुम्ही कधी विचार केला आहे का की पिझ्झा बॉक्स कधीच गोलाकार का बनत नाही. कुठल्याही कंपणीच्या  पिझ्झा बॉक्स (Pizza Box) चौकोनी का केला जातो?

गोल पिझ्झाच्या डब्याचा आकार चौकोनी का असतो? तुम्ही केला का कधी विचार?
पिझ्झा
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 07, 2023 | 6:06 PM

मुंबई : तरूण पिढी सोबतच आजकाल आजी- आजोबा देखील पिझ्झा चवीने खातात. शहरी भागांमध्ये पिझ्झा खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हीसुद्धा अनेकदा पिझ्झावर ताव मारला असेल, मात्र एका गोष्टीकडे तुमचे कधी लक्ष वेधले गेले आहे का? पिझ्झा गोलाकार असला तरी त्याचा डबा मात्र कायम चौकोनी असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पिझ्झा बॉक्स कधीच गोलाकार का बनत नाही. कुठल्याही कंपणीच्या  पिझ्झा बॉक्स (Pizza Box) चौकोनी का केला जातो? जर तुम्हाला याचे कारण माहित नसेल तर ही माहिती नक्कीच तुमच्या ज्ञानात भर टाकेल.

डबा चौकोनी असण्यामागे हे आहे कारण

वास्तविक, तज्ञांच्या मते, गोल पिझ्झाचे बॉक्स चौकोनी बनवण्यामागे अनेक कारणे आहेत. पहिले आणि मुख्य कारण म्हणजे कंपनीला गोल आकाराच्या तुलनेत चौकोन आकाराचे डबे बनवणे खूप सोपे आहे. गोलाकार बॉक्स बनवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि खर्चही जास्त लागतो.

एका मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीला चौकोन आकाराचे बॉक्स बनवण्यासाठी फक्त एक कार्डबोर्ड शीटची गरज असते, तर गोलाकार बॉक्स बनवण्यासाठी एकापेक्षा जास्त शीटची गरज पडते. याशिवाय एक बाब अशी आहे की चौकोनी बॉक्स सहज वापरता येतो. त्याची पकड तुलनेने सोपी असते. उदाहरणार्थ, पिझ्झा ओव्हन, फ्रीज, अगदी मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी योग्य आहे.

याशिवाय, हे देखील खरे आहे की जर बॉक्स गोल असेल तर तो पॅक करणे कठीण होईल. याशिवाय डिलेव्हरी बॉयला डबा चौकोनी असल्याने एकापेक्षा जास्त डबे हाताळणे सोपे जाते . पिझ्झा बॉक्स चौकोनी का बनवला जातो हे आता तुम्हाला कळले असेल. तसेच गोलाकार डबा न ठेवण्यामागचे तोटेही तुमच्या लक्षात आलेच असेल. अलीकडेच कोणीतरी हा प्रश्न सोशल मीडियावर पोस्ट केला, अनेक वापरकर्त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. पण यामागचे कारण काय आहे हे जाणण्यासाठी अनेकांची उत्सुकता होती.