AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WIFE म्हणजे काय? जगदगुरू रामभद्राचार्य यांनी सांगितला भयंकर अर्थ, सोशल मीडियात संतापाची लाट; असं काय म्हटलं जगदगुरूंनी?

Jagadguru Rambhadracharya : जगद्गुरू रामभद्राचार्य हे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी WIFE या शब्दाचा अर्थ सांगितला आहे.

WIFE म्हणजे काय? जगदगुरू रामभद्राचार्य यांनी सांगितला भयंकर अर्थ, सोशल मीडियात संतापाची लाट; असं काय म्हटलं जगदगुरूंनी?
jagadguru rambhadracharyaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Nov 29, 2025 | 9:34 PM
Share

जगद्गुरू रामभद्राचार्य हे एक प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ, कवी, लेखक आणि तत्वज्ञ आहेत. ते चित्रकूट येथील तुलसी पीठाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. जन्मतः अंध असूनही, त्यांनी 240 हून अधिक ग्रंथांची रचना केली आहे आणि 22 भाषांवर प्रभुत्व मिळवले आहे. अशातच आता जगद्गुरू रामभद्राचार्य हे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी WIFE या शब्दाचा अर्थ सांगितला आहे.

जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी WIFE या शब्दाचा अर्थ सांगताना म्हटले की, Wonderful Instrument For Enjoy याचा अर्थ पत्नी हे आनंद मिळवण्याचे मिळवण्याचे साधन आहे. फक्त विवाहित लोकच त्याचा खरा अर्थ समजू शकतात. त्यामुळे अविवाहित लोकांनी यावर बोलणे टाळावे, कारण त्यामुळे भांडण होऊ शकते असं त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ 25 जुलै 2025 रोजी रामभद्राचार्य यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. मात्र यातील काहीच भाग कट करून त्या द्वारे त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

रामभद्राचार्य यांचे पूर्ण विधान काय आहे?

जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले की इंग्रजीत WIFE म्हणतात तिला संस्कृतमध्ये पत्नी म्हणतात. इंग्रजी भाषेत WIFE किती धोकादायक आहे ते पहा. WIFE म्हणजे Wonderful Instrument For Enjoy.

पत्नीचा अर्थ सांगताना त्यांनी म्हटले की, यज्ञात पतीसोबत येणारीला पत्नी म्हणतात. आपल्या देशात पत्नी हनिमूनसाठी नसते. आपल्या देशात चंद्र नेहमीच मधुर असतो. आपल्या देशात पत्नीचा वापर आनंदासाठी नाही तर योगासाठी केला जातो. म्हणून, भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी संस्कृत आवश्यक आहे असंही जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी म्हटलं आहे.

दोन वर्षांपूर्वी जगतगुरु रामभद्राचार्य यांनी HUSBAND शब्दाची व्याख्या सांगितली होती. त्यांनी म्हटले होते की, H = Hellish, U = Unique, S = Selfies, B = Big, A = Actor, N = Needy, D = Disturber म्हणजे स्वार्थी आणि त्रासदायक असणारा महान अभिनेता. पतीचा अर्थ म्गणजे जो सतत आपल्या पत्नीचे रक्षण करतो. जो आपल्या पत्नीला रघुपती किंवा यदुपतीच्या चरणी ठेवतो तो पती आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था