Video : नवऱ्याच्या जुन्या पासपोर्टला बायकोने बनवली घरखर्चाची डायरी, व्हिडिओ पाहाल तर पोट धरुन हसाल

एका महिलेने नवऱ्याच्या पासपोर्टचे रूपांतर घर खर्चाच्या डायरीत केला आहे. त्याचा व्हिडिओ सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात जे काही लिहीलयं त्यामुळे नेटकरी पोट धरून हसू लागले आहेत

Video : नवऱ्याच्या जुन्या पासपोर्टला बायकोने बनवली घरखर्चाची डायरी, व्हिडिओ पाहाल तर पोट धरुन हसाल
passport viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 5:09 PM

घरात एखादी अशी वही असतेच ज्यावर आईने घराचा खर्च, किराणा मालाची यादी लिहिलेली असते. पण एका बायकोने कहरच केलाय, ही वही काही कामाची नाही, बऱ्याच दिवस पडून आहे,म्हणून त्यात त्या बाईने खर्चाचा हिशोब मांडला. मग काय ती वही कसली होती हे माहित आहे का? अहो ती काही सादी सुदी वही नव्हती, तर नवऱ्याचा जुना पासपोर्ट होता. आता या पासपोर्टवर मांडलेला खर्च सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या वडिलांचा जुना भारतीय पासपोर्ट दाखवत आहे. या पासपोर्टची मुदत संपलेली होती. त्यामुळे त्यातील रिकाम्या पानांचा वापर आईने घरातील कामांसाठी केला. मात्र या पानांवर नेमकं काय लिहिलं आहे, हे पाहिल्यावर अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

Loading...

पासपोर्टच्या पानांवर नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती आणि घरकाम करणाऱ्या लोकांचे फोन नंबर लिहिलेले दिसतात. एवढंच नाही, तर घरखर्चाचा सविस्तर हिशोबही त्यात नोंदवण्यात आला आहे. कोणाला किती पैसे दिले, लग्नात आहेराचा किती खर्च झाला. याची नोंद या पासपोर्टमध्ये करण्यात आली आहे. सरकारी रेशन दुकानातून घेतलेल्या वस्तू आणि पेट्रोलचा खर्चही त्यात लिहिलेला दिसतो.

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी घरातील मोठ्या मंडळींच्या वस्तूंचा असा उपयोग करण्याच्या सवयीची आठवण काढली, तर काहींनी पासपोर्टचं हिशोबाच्या वहीत रूपांतर हे फक्त भारतातच होऊ शकतं अशी मजेशीर टिप्पणी केली आहे.

 

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी घरातील मोठ्या मंडळींच्या वस्तूंचा असा उपयोग करण्याच्या सवयीची आठवण काढली. तर काहींनी पासपोर्टचा असा वापर करण्यामागचं कारण विचारलं. काही जणांनी तर पासपोर्टचं रूपांतर थेट फोन डायरी आणि हिशेबाच्या वहीत झाल्याची मजेशीर टिप्पणी केली.

पासपोर्ट हा महत्त्वाचा सरकारी दस्ताऐवज असल्याने त्याचा असा वापर करणं योग्य नाही. पण घरखर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी जुन्या पासपोर्टची डायरी बनवण्याची ही कल्पना पाहून सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ केरळातील आहे असे सांगण्यात येत आहे. पण नेमका कुठला आहे कधी शेअर करण्यात आला आहे याची माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us