AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या ट्रेनखाली पडलेल्या महिलेचे चमत्कारिकरित्या वाचले प्राण; पहा Shocking व्हिडीओ

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. शुद्ध हरपून अचानक धावत्या ट्रेनखाली पडलेल्या एका महिलेचा चमत्कारिकरित्या जीव वाचला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे.

धावत्या ट्रेनखाली पडलेल्या महिलेचे चमत्कारिकरित्या वाचले प्राण; पहा Shocking व्हिडीओ
धावत्या ट्रेनखाली पडलेल्या महिलेचे चमत्कारिकरित्या वाचले प्राणImage Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Apr 21, 2022 | 3:57 PM
Share

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. शुद्ध हरपून अचानक धावत्या ट्रेनखाली पडलेल्या एका महिलेचा चमत्कारिकरित्या जीव वाचला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत आहे. धावत्या ट्रेनखाली पडलेल्या त्या महिलेला नंतर प्लॅटफॉर्मवरील इतर प्रवाशांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं. “माझा जणू पुनर्जन्मच झाला”, अशी प्रतिक्रिया संबंधित महिलेने दिली. प्लॅटफॉर्मवर उभी असताना रक्तदाब कमी झाल्याने त्या महिलेला भोवळ (Woman Faints) आली होती. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याच सीसीटीव्हीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. (Train accident)

अर्जेंटिनामधील ब्युनस आयर्समधील एका स्वतंत्र रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली. व्हिडिओत दिसणाऱ्या पांढऱ्या पोशाखातील महिलेचा अचानक तोल ढासळतो आणि ती धावत्या ट्रेनखाली पडते. ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, कँडेला असं या महिलेचं नाव आहे. नंतर तिला प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या इतर प्रवाशांनी सुखरूप बाहेर काढलं. ही घटना 29 मार्च रोजी घडली. प्लॅटफॉर्मवर उभे असलेले इतर प्रवासी ही घटना पाहून घाबरले होते. नंतर ट्रेन थांबवून त्यांनी महिलेला बाहेर काढलं आणि चमत्कारिकरित्या तिचे प्राण वाचले. विशेष म्हणजे त्या महिलेला कोणतीही गंभीर दुखापतही झाली नाही.

पहा व्हिडीओ-

“माझे प्राण कसे वाचले हे मलाच माहीत नाही. मी अजूनही हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. माझा रक्तदाब अचानक कमी झाला आणि मी बेशुद्ध पडले. माझ्या समोर असलेल्या व्यक्तीला मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्या पलीकडे मला काहीच आठवत नाहीये. ट्रेनला धडकल्याचा क्षणही मला आठवत नाहीये. जणू माझा पुनर्जन्मच झाला आहे,” अशी प्रतिक्रिया कँडेलाने एका मुलाखतीत दिली.

हेही वाचा:

Exclusive: फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराजनंतर पुढे काय? अखेर मिळालं उत्तर

‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद