Desi Jugaad Viral Video: हेअर स्ट्रेट करण्यासाठी महिलेचा देशी जुगाड, पण झालं होत्याच नव्हतं

कॅमेरा चालू करून केस सरळ करण्यासाठी महिला देसी हॅक दाखवत होती, पण या भयानक कृत्याचा परिणाम असा झाला की त्या महिलेने कदाचित स्वप्नातही याची कल्पना केली नसेल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Desi Jugaad Viral Video: हेअर स्ट्रेट करण्यासाठी महिलेचा देशी जुगाड, पण झालं होत्याच नव्हतं
हेअर स्ट्रेट करण्यासाठी महिलेचा देशी जुगाड
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jan 22, 2025 | 2:03 PM

प्रत्येक गोष्टीत देशी जुगाड वापरून आपलं काम सोपं करण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण असतात. पण हे देशी जुगाड करताना प्रत्येकवेळी तुम्हाला यश मिळेल असे नाही. काहीजण पैशांच्या बचतीसाठी भयानक जुगाड करण्याच्या मागे अनेकदा अडचणीत सापडतात. तसेच सोशल मीडियावर दाखवलेल्या उपायांचा अवलंब करत कोणतेही सल्ला न घेता देशी उपाय केल्याने त्याचे परिणाम चांगले येतील असे नाही. आता जरा व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील महिलेचा देशी जुगाड बघा. या व्हिडिओमध्ये महिला केस सरळ करण्यासाठी विचित्र जुगाड वापरताना दिसत आहे. मात्र पार्लरमधील काहीसे पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात केलेल्या जुगाडाचे मात्र महिलेला त्याचे भयानक परिणाम सोसावे लागलेत.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात तर एक महिला हातात चिमटा घेऊन किचनमध्ये उभी आहे. त्यानंतर ही महिला किचन मध्ये असलेला गॅस चालू करते आणि त्या आगीवर चिमटा गरम करते आणि स्वतःच्या केसांवर हेअर स्ट्रेटनरप्रमाणे फिरवते. मात्र हा देशी जुगाड करताना या महिलेचे केस काही स्ट्रेट होत तर नाही, पण या आगळ्यावेगळ्या जुगाडांमुळे जे काही झालं त्याचा या महिलेने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला तिच्या केसांमधून गरम चिमटा फिरवत असताना केसांचा गुच्छा चिमट्यासह बाहेर येतो आणि पूर्णपणे जळून जातो. त्या महिलेच्या या भयानक कृत्याचा परिणाम बघून तुम्ही म्हणू शकता की एवढे चांगले केस असताना देशी जुगाड करण्याच्या नादात केस खराब केले. दरम्यान व्हिडीओ बनवताना महिलेला तिची चूक लगेच लक्षात येते आणि व्हिडिओ तिथेच थांबवते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

हा भयानक हॅक व्हिडिओ @miniandmimivibes या इंस्टा हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. 13 जानेवारीला अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 3 00,000 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत, तर कमेंट सेक्शनमध्ये हसण्याच्या इमोजीचा पाऊस पडला आहे. तर यावर एका युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे काय झाले?” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट केली की, हा व्हिडिओ लोकांना मजेशीर वाटत असला तरी तो चिंताजनक आहे. यामुळे अपघात होऊ शकतो. आणखी एका युजरने म्हटले की, अरे बहीण! स्ट्रेटनर घ्या. तुम्ही केस का खराब करत आहात?