Airport वर मुलींनी तब्बल 6 किलोचे कपडे घातले, फ्लाइट मध्ये चढण्याआधी झाली पोल खोल आणि मग…

| Updated on: May 21, 2023 | 9:28 AM

Airport baggage rules: विमानात प्रवासादरम्यान जास्त वजन असेल, म्हणजेच नियमापेक्षा जास्त तर ते कमी करायला सांगितलं जातं किंवा ते थांबवलं जातं. अनेकदा लोक यात पकडले जातात. लोक सुद्धा आता नियमाला प्रचंड वैतागलेत. यात अनेकदा दंड देखील ठोठावला जातो आणि हा दंड कमी नसतो.

Airport वर मुलींनी तब्बल 6 किलोचे कपडे घातले, फ्लाइट मध्ये चढण्याआधी झाली पोल खोल आणि मग...
Airport rules
Follow us on

मुंबई: विमानात प्रवास करण्यासाठी अनेक नियम करण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान विमानात सामनाचं वजन वाहून नेण्याचे देखील नियम आहेत. विमानात प्रवासादरम्यान जास्त वजन असेल, म्हणजेच नियमापेक्षा जास्त तर ते कमी करायला सांगितलं जातं किंवा ते थांबवलं जातं. अनेकदा लोक यात पकडले जातात. लोक सुद्धा आता नियमाला प्रचंड वैतागलेत. यात अनेकदा दंड देखील ठोठावला जातो आणि हा दंड कमी नसतो.

असाच एक प्रकार नुकताच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विमानतळावरून समोर आला आहे. इथे दोन मुलींनी प्रवासात अधिक वजन घेऊन जायचा कट रचला, परंतु त्यांचा प्लॅन फसला आणि त्यांना पकडण्यात आले. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विमानतळावर दोन मुलींनी निर्धारित वजनापेक्षा जास्त सामान नेले आणि अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी तब्बल 6 किलो वजनाचे कपडे परिधान केले.

त्यांची ही युक्ती कुणीच पकडू शकणार नाही असं त्यांना वाटलं. पण त्यांचा डाव पकडला गेला. हँड बॅग ७ किलो वजन वाहून नेऊ शकते, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते, तरीही त्यांनी हे उद्योग केले. त्यांनी ठरवून दिलेल्या वजनाच्या दुप्पट वजन सोबत नेले आणि तेथे पोहोचल्यानंतर भरपूर कपडे घातले. 6 किलो वजनाचे कपडे घातल्यानंतर ती अस्वलासारखी दिसू लागली. तिथे उपस्थित सर्वजण त्यांच्यावर हसत होते. काही लोकांना त्यांचा प्लॅन समजला आणि त्यांचा प्लॅन पाहून लोकांनाही खूप राग आला.

अखेर विमानात चढण्यापूर्वी विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने त्यांना पाहिले आणि तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. या दोन्ही मुलींना पकडण्यात आले आणि त्यांना विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. या कामासाठी त्यांना 65 डॉलर म्हणजेच जवळपास 5,200 रुपये दंड भरावा लागला . या दोन्ही मुली मेलबर्नच्या सहलीनंतर एडिलेड या ठिकाणी परतत होत्या.