
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिलेच्या घटस्फोटाच्या खटल्यावर हायकोर्टात सुनावणीदरम्यान पतीवर आरोप केला की, त्याला सेक्स करण्यात रस नाही आणि तो मुलांचा देखील विचार करत नाही. महिलेने सांगितले की तिचा नवरा आपला वेळ फक्त मंदिर आणि आश्रमात घालवतो. त्याने तिला आपल्यासारखे आध्यात्मिक बनवण्याचा प्रयत्न केला. पत्नीने सांगितले की तिच्या पतीचे लक्ष केवळ धार्मिक कार्यांवर होते, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढला होता.
हा घटना केरळमध्ये घडली आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेत महिलेने म्हटले आहे की, लग्नानंतर तिच्या पतीच्या वागण्यात बदल झाला होता आणि तो तिला आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी जबरदस्ती करत असे. पतीने तिला अभ्यास करण्यापासून रोखल्याचा आरोपही तिने केला आहे. यानंतर, महिलेने 2019 मध्ये घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली. परंतु पतीने आपले वर्तन सुधारेल असे आश्वासन दिले. त्यामुळे तिने याचिका मागे घेतली. मात्र, 2022 मध्ये महिलेने पुन्हा घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. कारण तिच्या पतीची वागणून बदलली नाही.
वाचा: जगातील ‘या’ देशात कंडोम सोन्यापेक्षाही महाग! एका पॅकेटची किंमत 750 डॉलर
कौटुंबिक न्यायालयाने तिच्या याचिकेवर विचार करून घटस्फोटाचा आदेश दिला. त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि दावा केला की आपल्या आध्यात्मिक गोष्टींचा गैरसमज करुन घेतला आहे. पत्नीनेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करेपर्यंत मुलाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलेच्या अर्जावर हायकोर्टाने काय म्हटले?
न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि न्यायमूर्ती एम.बी. स्नेलता यांचा समावेश असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकालात म्हटले आहे की, जोडीदाराला दुसऱ्याच्या वैयक्तिक समजुती बदलण्याचा किंवा त्यावर दबाव आणण्याचा अधिकार नाही. पतीने पत्नीला आध्यात्मिक जीवन जगण्यास भाग पाडणे हे मानसिक क्रूरतेचे उदाहरण असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. पतीने कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आणि वैवाहिक कर्तव्ये पार पाडत नसल्याचे हे संकेत असल्याचे न्यायालयाने मानले.