Video | काचेच्या बॉटलवर तरुणीकडून योगा करण्याचा प्रयत्न, मध्येच घडलेल्या घटनेमुळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या असाच एका तरुणीचा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी योगा करताना चांगलीच पडली आहे.

Video | काचेच्या बॉटलवर तरुणीकडून योगा करण्याचा प्रयत्न, मध्येच घडलेल्या घटनेमुळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
woma-fell-down

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. या मंचावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही मोजकेच असे व्हिडीओ असतात जे व्हायरल होतात. महिलांसोबत झालेल्या फजितीचे व्हिडीओ तर सोशल मीडियावरुन मोठ्या चवीने पाहिले जातात. सध्या असाच एका तरुणीचा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी योगा करताना चांगलीच पडली आहे. (women doing online yoga video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हडीओमध्ये एक तरुणी दिसत आहे. ही तरुणी विविध योगासने करताना दिसते आहे. मात्र, हीच तरुणी जेव्हा एक आसन करुन दाखवते आहे. तेव्हा तिची चांगलीच फजिती झाली आहे. या तरुणीने जमिनीवर नाही तर थेट काचेच्या बॉटलवर उभे राहून योगा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याच वेळी ही तरुणी आपला तोल सांभाळू शकलेली नाही. परिणामी ती जमिनीवर धाडकन पडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ही तरुणी खाली पडली असल्यामुळे तिला चांगलाच मार लागला असावा असे सांगण्यात येत आहे. तसाच काहीसा आवाज ही मुलगी खाली पडल्यानंतर आला आहे. या मुलीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला पाहून मजेदार कमेंट्स करत असून खळखळून हसतसुद्धा आहेत. सध्या या व्हिडीओला पाहण्यासाठी लोक लाखोंच्या संख्येने येत आहेत.

इतर बातम्या :

Video | ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत लिप लॉक, किसिंगचा व्हिडीओ जगभरात व्हायरल

Video: ब्रेकिंग न्यूज सांगताना पत्रकार थांबला, लाईव्ह टीव्हीवर म्हणाला ‘पगार मिळत नाहीये, आम्हीही माणसंच’

मौजमजा करण्यासाठी धरणावर गेले, पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दोघेही जात होते वाहून, पाहा थरारक व्हिडीओ

(women doing online yoga video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI