World record : तरूणीच्या उंचीमुळे दोनवेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या 20 लाखांवर

| Updated on: Apr 29, 2022 | 1:37 PM

"जेव्हा माझा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा माझ्या कुटुंबाने मला माझी उंची आणि अनुभव या बद्दल पोस्ट करण्यास सांगितले. पोस्टच्या माध्यमातून मी स्वत:वर प्रेम करायला शिकले. मी लोकांना सांगू इच्छितो की लोक विचार करतात तसे उंच असणे वाईट नाही"

World record : तरूणीच्या उंचीमुळे दोनवेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या 20 लाखांवर
तरूणीची उंचीमुळे दोनवेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद,
Image Credit source: instragram
Follow us on

नवी दिल्ली – एका मुलीने आपल्या उंचीमुळे दोन विश्वविक्रम (World record) तिने तिच्या नावावर केले आहेत. आता सोशल मीडियावर सेलिब्रिटी (Celebrity) बनली आहे. लाखो लोक तिच्या सोशल मीडियाला फॉलो करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना सकारात्मक शरीराशी संबंधित चांगले मेसेज शेअर करीत असते. या तरूणीचं नाव मॅकी करिन (Maci Currin)असं आहे. ती सध्या अमेरिकेत वास्तव करीत आहे. तिचं वय सध्या 19 वर्षे असून तीची दोनवेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पहिलं कारण लांब पायासाठी, तर दुसरं कारण लहान सुंदर पायासाठी तिची नोंद झाली आहे.

सोशल मीडियावरती लाखो चाहते

अमेरिकेत असलेल्या मॅकीची उंची 6 फूट 10 इंच आहे. त्याचबरोबर तिचे पाय एकूण उंचीच्या 60 टक्के आहेत. मॅकीचा उजवा पाय 134.3 सेंटीमीटर आहे, तर डावा पाय 135.36 सेंटीमीटर आहे. तिच्या शरीराची ही अनोखी रचना तीन कधीही लपविलेली नाही. तिने तिच्या शरिराच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी खुल्या मनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत मांडल्या आहेत. मॅकी खुलेपणाने बोलत असल्याने तिच्या सोशल मीडियावरती लाखो चाहते तिला लाईक करतात.

टिकटॉकवर मॅकीच्या फॉलोअर्सची संख्या 20 लाखांवर

गेल्या दोन वर्षांत टिकटॉकवर मॅकीच्या फॉलोअर्सची संख्या 20 लाखांवर पोहोचली आहे. ‘द सन’शी केलेल्या संभाषणात मॅकीने सांगितले की,तिने टिकटॉक हे गमतीने सुरू केले होते. पण तिच्या एका व्हिडिओला 36.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्यानंतर तीने त्यातलं गांभीर्य ओळखलं आणि चांगल्या पध्दतीने सोशल मीडिया हाताळायला सुरूवात केली. आज ती अमेरिकेत सोशल मीडियाची स्टार झाली आहे.

उंच असणे वाईट नाही

“जेव्हा माझा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा माझ्या कुटुंबाने मला माझी उंची आणि अनुभव या बद्दल पोस्ट करण्यास सांगितले. पोस्टच्या माध्यमातून मी स्वत:वर प्रेम करायला शिकले. मी लोकांना सांगू इच्छितो की लोक विचार करतात तसे उंच असणे वाईट नाही” असं मॅकी म्हणते. मॅकीला भविष्यात यूकेच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. जगातील सर्वात लांब व्यावसायिक मॉडेलचा विक्रम करण्याची तिची इच्छा आहे.