Video | तरुणाच्या अंगावर जिकडे-तिकडे वाद्ये, कर्णमधुर संगीतावर नेटकरी फिदा

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका तरुणाचा आहे. तरुणाच्या कलाकारीने नेटकरी अवाक् झाले आहेत.

Video | तरुणाच्या अंगावर जिकडे-तिकडे वाद्ये, कर्णमधुर संगीतावर नेटकरी फिदा

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ तर आपल्याला अवाक् करणारे असतात. या व्हिडीओंमध्ये लोक अनेक कलाकारी करुन दाखवतात. त्यांची हीच कलाकारी नंतर चर्चेचा विषय ठऱते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका तरुणाचा आहे. तरुणाच्या कलाकारीने नेटकरी अवाक् झाले आहेत. (young boy playing multiple instruments video went viral on social media)

खांद्यावर, तोंडात तसेच पाठीवर वाद्ये लटकलेली 

या व्हिडीओमध्ये एक तरुण चांगलीच करामत करताना दिसतोय. या तरुणाच्या अंगावर आपल्याला विविध वाद्ये दिसतात. खांद्यावर, तोंडात तसेच पाठीवर त्याने ही वाद्ये लटकवली आहेत. हा तरुण हात, पाय तसेच तोंडानेसुद्धा वेगवेगळी वाद्ये वाजवत आहे. त्याच्या याच टॅलेन्टची नेटकरी वाहवा करत आहेत.

नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. अशा प्रकारचा टॅलेन्ट हा भारताची शान असल्याचे एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने प्रत्येकाकडे काहीतरी कला असते, पण या तरुणाची ही कला मला सर्वांपेक्षा वेगळी वाटली, अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. सोबतच त्यांनी “नॉर्थ ईस्ट भारतातील अमर” असं मजेदार कॅप्शन दिलं आहे. लोक हा व्हिडीओ पाहून त्याला लाईक करत आहेत. तसेच शेअरसुद्धा करतायत.

इतर बातम्या :

Video | नळाखालून कात्री फिरवली, थेट वाहत्या पाण्याला कापलं, चक्रावून सोडणारी जादू एकदा पाहाच !

Video | सापाला तोंडात धरून गोल-गोल फिरवलं, कुत्र्याच्या पिल्लांची करामत एकदा पाहाच !

Video | पिंजऱ्यात डांबून जंगलात आणलं, बाहेर आल्यानंतर वाघाने काय केलं ? एकदा पाहाच

(young boy playing multiple instruments video went viral on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI