Video : तरूणीने केलं चित्त्याच्या गालावर किस, नेटकरी म्हणतात, “धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी!”

हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर WORLD GEO SAFARIS या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.

Video : तरूणीने केलं चित्त्याच्या गालावर किस, नेटकरी म्हणतात, धाडसाचं कौतुक करावं तितकं कमी!
| Updated on: May 13, 2022 | 8:30 AM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज काहीतरी नवीन गोष्ट व्हायरल होत असते. या व्हीडिओंमध्ये प्राण्यांच्या व्हीडिओंची संख्या जास्त आहे. लोकांना प्राण्यांचे व्हीडिओ खूप आवडतात. त्याला ते चांगली पसंती देतात शिवाय त्याला चांगले व्ह्यूज आणि लाईकही मिळतात. त्यातही जर एखाद्या व्हीडिओत माणसांचं प्राण्यांबद्दलचं प्रेम दिसत असेल तर त्याला सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात एक तरूणी चक्क एका चित्त्याला (Leopard) किस करताना दिसत आहे. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यात एक तरूणी चक्क एका चित्त्याला किस करताना दिसत आहे. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हीडिओत तरूणी आणि चित्ता अगदी जवळजवळ आहेत. त्यानंतर ही तरूणी त्याला किस करते. मग हा चित्ताही तिला प्रतिसाद देतो तोही तिच्या गालावर किस करताना पाहायला मिळत आहे.

हा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर WORLD GEO SAFARIS या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सने कमेंट बॉक्समध्ये या व्हीडिओवर खूप आश्चर्य व्यक्त केलं आहे. एकाने लिहिलंय, “या तरूणीला भिती वाटत नाही का? तिच्या धाडसाचं कौतुक” दुसरा म्हणतो, “जगात केवळ प्राणीच खुल्या मनाने प्रेम करतात. अगदी निस्वार्थपणे”

WORLD GEO SAFARIS या अकाऊंटवरून आणखी काही प्राण्यांचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करण्यात आले आहेत. एक तरूणी माकडासमोर बसलेला एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

एका तरूणीच्या डोक्यावर कोंबडीचं पिल्लू बसलेलं दिसत आहे.

तर एक लहान मुलगा आणि हत्ती यांचं प्रेम सांगणारा एक व्हीडिओही सध्या व्हायरल होत आहे.