Video : परदेशातील रस्त्यावर ‘चंद्रमुखी’ची हवा!, जैनिल मेहताचा ‘सुंदरा’ डान्स…

Video : परदेशातील रस्त्यावर 'चंद्रमुखी'ची हवा!, जैनिल मेहताचा 'सुंदरा' डान्स...

अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्यावर जैनिल मेहता या तरूणाने हा डान्स केलाय. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो अगदी अमृता सारख्या गाण्याच्या स्टेप्स करताना पाहायला मिळत आहे.

आयेशा सय्यद

|

May 12, 2022 | 12:00 PM

मुंबई : प्रसाद ओकचं दिग्दर्शन, अजय-अतुलचं संगीत आणि कलाकारांचं दमदार अभिनय यांमुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. अभिनेत्री अमृता खानविलकरची (Amruta Khanvilkar) लावणी तर अनेकांच्या मनात घर करून आहे. चंद्रा गाण्याने तर अनेकांची मनं जिंकली आहेत. अश्यात आता या गाण्याचा परदेशी चाहता समोर आला आहे त्याने अमृताच्या चंद्रा गाण्यावर डान्स केलाय. जैनिल मेहता (Jainil Mehta) या तरूणाने हा डान्स केलाय. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘चंद्रा’वर परदेशात डान्स

अमृता खानविलकरच्या चंद्रा गाण्यावर जैनिल मेहता या तरूणाने हा डान्स केलाय. त्याचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो अगदी अमृता सारख्या गाण्याच्या स्टेप्स करताना पाहायला मिळत आहे. तो एका खान्याच्या स्टॉलसमोर हा डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्याने घागरा घालून हा डान्स केलाय. त्याचा हा व्हीडिओ लाखो लोकांनी पाहिलाय. तर 57 लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर स्वत: अमृता खानविलकरनेही यावर कमेंट केली आहे. खूपच सुंदर डान्स केल्याचं तिने म्हटलंय.

जैनिल हा डान्सर आहे. तो भारतीय गाण्यावर डान्स करून त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. याआधीही त्याने घागरा घालून आलियाच्या गंगुबाईमधल्या गाण्यावर डान्स केला होता. जो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. ज्याला लाखो लोकांनी पाहिलं आहे. “माझ्यासाठी हे नृत्यदिग्दर्शन नाही, तर रस्त्यावर नाचणे आणि लोकांशी संवाद साधणे हा आहे! माझ्यासाठी हे गाणे मी किती चांगले नृत्य आणि नृत्यदिग्दर्शन करू शकतो याबद्दल नाही तर मी संगीताचे योग्य सार किती चांगले व्यक्त करू शकतो आणि आणू शकतो! याचा आहे” ,असं या व्हीडिओला कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील ‘झूम रे गोरी’ या लोकप्रिय गाण्यावर तो डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तीस लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर आठ लाखांहीन अधिकांनी लाईक केलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें