Viral Video | हात जोडून विनंती करतोय, दारु पिऊ नका, आणि स्वत: प्रचंड डुलतोय, पाहा भन्नाट व्हीडीओ

अवघ्या काही दिवसांपूर्वी होळी आणि रंगपंचमी पार पडली. या तरुणाने होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Viral Video |  हात जोडून विनंती करतोय, दारु पिऊ नका, आणि स्वत: प्रचंड डुलतोय, पाहा भन्नाट व्हीडीओ
| Updated on: Mar 11, 2023 | 9:39 PM

मुंबई | सोशल मीडियावर दररोज अनेक व्हीडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हीडिओ हे नेटकऱ्यांच्या पंसतीस उतरतात. व्हायरल व्हीडिओ हे कॉमेडी, सामाजिक संदेश देणारे, माहितीपूर्ण, मनोरंजनात्मक अशा प्रकारचे असतात. मात्र यूझर्सचा सर्वसाधारपणे कॉमेडी व्हीडिओ पाहतात. सोशल मीडियावर अशाच एका तरुणाचा व्हीडिओ हा तुफान व्हायरल झालाय. या व्हीडिओत हा तरुण होळी आणि रंगपंचमी निमित्ताने सर्वाना शुभेच्छा देतोय. आतापर्यंत आम्हीतुम्ही एकमेकांना होळी आणि धुळीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र तुम्ही अशा खतरनाक शुभेच्छा दिल्या, ऐकल्या नसतीलच. हा 1 मिनिट 52 सेंकदांचा व्हीडिओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरुन हसाल.

” सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. आजचा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करतात”, अशा पद्धतीने सर्व सणांची सांगड घालत या तरुणाने होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

होळीच्या अजब शुभेच्छा


व्हीडिओतला तरुण हा स्वत: डुलतोय. मात्र तो सर्वांना तितकंच महत्वाचं आवाहन या व्हीडिओतून करतोय. धिंगाणा पिऊन दारु करु नये. तसेच तुमच्या घरच्यांना माझ्या घरच्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. दारु कुणीच पिऊ नये, घरी राहून उटणं लावावं”, अशा या विचित्र शुभेच्छा हा तरुण देतोय.

दरम्यान या व्हीडिओवर अनेक संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही नेटकरी या तरुणाच्या या विचित्र पण भन्नाट शुभेच्छांचं कौतुक करतायेत. तर दुसऱ्या बाजूला मात्र काहींनी या बाबत संताप व्यक्त केलाय. असं असलं तरी हा व्हीडिओ व्हायरल होतोय, इतकं मात्र नक्की.