Funny dance : यांना कोणीही आवरू शकत नाही! तरुणांच्या नृत्याचा हा Viral video पाहा आणि खळखळून हसा

Funny dance : यांना कोणीही आवरू शकत नाही! तरुणांच्या नृत्याचा हा Viral video पाहा आणि खळखळून हसा
व्हायरल होत असलेला तरुणांचा डान्स
Image Credit source: Youtube

Funny dance video : लग्नसमारंभ किंवा कोणता सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर तिथे डान्स होतोच. काही कार्यक्रमांमधला डान्स (Dance) पाहून तर आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे.

प्रदीप गरड

|

Mar 29, 2022 | 8:30 AM

Funny dance video : लग्नसमारंभ किंवा कोणता सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर तिथे डान्स होणार नाही, असे कधीच होऊ शकत नाही. कोणत्याही कार्यक्रमात तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा असतो. लग्न असो, वाढदिवस असो अथवा आणखी कोणता कार्यक्रम. डान्स करण्यासाठी तरूण आतूर असतात. आजकाल तर धार्मिक कार्यक्रमातही वेडावाकडा डान्स केला जातो, त्यामुळे त्या धार्मिक कार्यक्रमाचे पावित्र्य निघून गेल्यासारखेच होते. थोडक्यात काय तर डान्स हा कोणत्याही कार्यक्रमाचा अविभाज्य भागच झाला आहे. काही कार्यक्रमांमधला डान्स (Dance) पाहून तर आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाला आहे. हा व्हिडिओ अत्यंत विनोदी असून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. चला तर जाणून घेऊ…

डान्स पाहून हसू आवरणार नाही

व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्टेज दिसेल. मागे एक फ्लेक्स लावला आहे. तर या स्टेजवर काही तरूण उभे आहेत. मागे काही तरूण असून त्यांच्यातलाच एक डान्स करत आहे. त्याचा डान्स पाहून आपल्याला हसू आवरत नाही. एका म्यूझिकवर तो असे काही शारीरिक व्यायाम करतो, की आपलाही हसून हसून व्यायाम होईल. शेवट तर फारच हसवणारा आहे. दुसरा एकजण थेट स्टेजवर येवून जो काही धुमाकूळ घालतो, ते पाहून पोट दुखेल.

यूट्यूबवर अपलोड

हा व्हिडिओ कुठला आहे, हे तर समजू शकलेले नाही, मात्र एका तमिळ कार्यक्रमातला हा व्हिडिओ असल्याचे दिसते. हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर मराठी मीडिया (Media Marathi) या चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला असून डान्स करण्याच्या त्यांच्या स्टाइलवर सर्वचजण पोट धरून हसत आहेत.

आणखी वाचा :

थोड्याशा मौजमजेनं घेतला जीव! 430 फूट उंच पाळण्यावरून पडला, आई-वडिलांच्या समोर मुलाचा करुण अंत

Will Smith Chris Rock : विल स्मिथनं ख्रिस रॉकला ठोसा मारला काय… इकडे ट्विटरवर आला मीम्सचा महापूर

Snakes rare moments : कॅमेऱ्यात कैद नागांची प्रणयक्रीडा; वडाळ्यातला दुर्मीळ Video viral

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें