Will Smith Chris Rock : विल स्मिथनं ख्रिस रॉकला ठोसा मारला काय… इकडे ट्विटरवर आला मीम्सचा महापूर

Will Smith Chris Rock : विल स्मिथनं ख्रिस रॉकला ठोसा मारला काय... इकडे ट्विटरवर आला मीम्सचा महापूर
Will smith slaps Chris rock
Image Credit source: Reuters

Oscars 2022 : हॉलिवूडचा (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने (Will Smith) ऑस्करचा होस्ट ख्रिस रॉकच्या (Oscar Host Chris Rock) तोंडावर ठोसा मारला. या घटनेपासून ट्विटरवर #WillSmith, #ChrisRock आणि #TheOscars हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

प्रदीप गरड

|

Mar 28, 2022 | 2:24 PM

Oscars 2022 : ऑस्कर 2022च्या मंचावर एक घटना घडली, ज्याची लोकांनी कल्पनाही केली नसेल. खचाखच भरलेल्या सभागृहात हॉलिवूडचा (Hollywood) प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याने ऑस्करचा होस्ट ख्रिस रॉकच्या (Oscar Host Chris Rock) तोंडावर ठोसा मारला. खरेतर, होस्टने विल स्मिथच्या पत्नीची चेष्टा केली, त्यानंतर अभिनेता विल स्मिथ स्वत:ला आवरू शकला नाही आणि त्याने स्टेजवर जाऊन होस्टला धक्काबुक्की केली. ऑस्करच्या मंचावर झालेल्या या ऐतिहासिक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या जगात वाऱ्यासारखा पसरला आहे. व्हिडिओमध्ये विल स्मिथ रागाने ख्रिस रॉकवर हात उचलताना दिसत आहे. यासोबतच विल स्मिथने ख्रिस रॉकला पत्नीबद्दल अधिक काही बोलू नका, असा इशाराही दिला. या घटनेपासून ट्विटरवर #WillSmith, #ChrisRock आणि #TheOscars हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.

उडवताहेत खिल्ली

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथला हे करताना पाहून सोशल मीडियाच्या लोकांनाही आश्चर्य वाटत आहे. ट्विटरवर विल स्मिथ आणि ख्रिस रॉक यांच्यातील या संघर्षानंतर मीम्सचा पूर आला आहे. मजेशीर मीम्सच्या माध्यमातून लोक या प्रकरणावर सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत. काही जण विल स्मिथच्या पंचावर आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काहीजण त्याची खिल्ली उडवत आहेत. निवडक ट्विट्सवर एक नजर टाकू या…

नेमके काय होते प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, होस्ट क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. ख्रिस रॉकने जाडाच्या टक्कल पडण्याची खिल्ली उडवली होती, ज्यानंतर विल स्मिथचा संयम सुटला. ख्रिस रॉक म्हणाला, की G.I. Jane फिल्म जेडाला याकरिता घेण्यात आले होते, की तिच्या केस नव्हते, त्यामुळे… विल स्मिथची पत्नी आजाराशी झुंज देत आहे, त्यामुळे तिने तिचे केस कापले आहेत. ख्रिस रॉकचे हे विधान ऐकून विल स्मिथला इतके वाईट वाटले, की त्याने स्टेजवर जाऊन त्याला धक्काबुक्की केली. यानंतरही विल स्मिथ थांबला नाही. स्टेजवरून उतरल्यानंतरही तो ख्रिस रॉकवर भडकताना दिसला.

आणखी वाचा :

Snakes rare moments : कॅमेऱ्यात कैद नागांची प्रणयक्रीडा; वडाळ्यातला दुर्मीळ Video viral

Video viral : ‘या’ महाभागाला पाहा; पोलिसांना एकवेळ चकवा देईल, पण यमराजाला..?

सॅलड खाण्याची स्पर्धा तीही सशांबरोबर! कोण जिंकलं? भन्नाट Challenge video पाहाच

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें