थोड्याशा मौजमजेनं घेतला जीव! 430 फूट उंच पाळण्यावरून पडला, आई-वडिलांच्या समोर मुलाचा करुण अंत

थोड्याशा मौजमजेनं घेतला जीव! 430 फूट उंच पाळण्यावरून पडला, आई-वडिलांच्या समोर मुलाचा करुण अंत
याच उंच पाळण्यावरून पडून मुलाचा मृत्यू झाला
Image Credit source: Twitter

थीम पार्क (Theme park) आणि त्यातील सर्वप्रकारची मोठमोठी खेळणी लहान मुलांना आणि तरुणांना नेहमीच आकर्षित करतात. मात्र कधीकधी अशा उंच झुल्यांवर बसणे जीवघेणे ठरू शकते. अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला.

प्रदीप गरड

|

Mar 28, 2022 | 5:36 PM

थीम पार्क (Theme park) आणि त्यातील सर्वप्रकारची मोठमोठी खेळणी लहान मुलांना आणि तरुणांना नेहमीच आकर्षित करतात. अत्यंत उंचावरून ही राइड (Ride) होत असते. त्यामुळे एक वेगळाच उत्साह (Enthusiastic) असतो. मात्र कधीकधी अशा उंच झुल्यांवर बसणे जीवघेणे ठरू शकते. अशीच एक दुर्दैवी घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. थीम पार्क राइड जिथून हा मुलगा खाली पडला त्याचं नाव आहे ‘ऑरलँडो फ्री फॉल राइड’. अपघातानंतर संबंधित मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला वाचवता आले नाही. हा अपघात झाला तेव्हा मुलाचे आई-वडील जवळच उभे होते. सुमारे 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने हा मुलगा 430 फूट उंचीवरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरक्षा बेल्ट बांधला होता, की नाही हे अस्पष्ट

या घटनेनंतर, मुलाने शरीरावर सुरक्षा बेल्ट बांधला होता, की नाही हे स्पष्ट झाले नाही. रात्री 11 वाजता हा अपघात झाला. त्याचवेळी, उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले, की सुरुवातीला जेव्हा हा मुलगा खाली पडला तेव्हा त्यांना झुल्याचा तुकडा पडल्याचे वाटले, पण नीट बघितल्यावर खाली एक मुलगा पडला होता.

मागच्या वर्षीही झाला होता अपघात

थीम पार्कमधील ड्रॉप टॉवर राइड गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झाली. यापूर्वी 2020मध्येही अपघात झाला होता, जेव्हा एका कर्मचाऱ्याचा दुसऱ्या राइडवरून पडून मृत्यू झाला होता. 430 फूट वर गेल्यावर ही राइड ताशी 120 किलोमीटर वेगाने खाली येते.त्याचवेळी हा मुलगा या राइडमधून कसा कोसळला, याचा तपास आता सुरू झाला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसे, या राइड कंपनीचा मालक स्लिंगशॉट ग्रुप आहे. त्यांचे सीईओ मीडियाशी बोलताना दावा केला, की आम्ही संपूर्ण सुरक्षिततेने राइड चालवतो. सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जाते.

आणखी वाचा :

Video viral : ‘या’ महाभागाला पाहा; पोलिसांना एकवेळ चकवा देईल, पण यमराजाला..?

सॅलड खाण्याची स्पर्धा तीही सशांबरोबर! कोण जिंकलं? भन्नाट Challenge video पाहाच

महिनाभर अडकले होते घनदाट जंगलात; अखेर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी देवदूत बनून आला एक लाकूडतोड्या!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें