अहमदाबादच्या अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, 15 जखमी

हिमाचलची घटना ताजी असतानाच आता गुजरातच्या अहमदाबाद येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या कांकरिया अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने एक मोठी दुर्घटना घडली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Ahmedabad Kankaria amusement park, अहमदाबादच्या अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, 15 जखमी

गांधीनगर : हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये हॉटेल कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 35 जवानांसह 50 जण या इमारतीखाली दबल्याची माहिती आहे. हिमाचलची घटना ताजी असतानाच आता गुजरातच्या अहमदाबाद येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या कांकरिया अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने एक मोठी दुर्घटना घडली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत.

Ahmedabad Kankaria amusement park, अहमदाबादच्या अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू, 15 जखमी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही दुर्घटना राईड्स म्हणजेच झोपाळा तुटल्याने झाली. यामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी असल्याची माहिती आहे.

अहमदाबाद अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे आणि सध्या बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण, दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

आज (14 जुलै) रविवार असल्याने या कांकरिया अम्यूझमेंट पार्कमध्ये लोकांची मोठी गर्दी होती. अनेकजण याठिकाणी मौजमजा करण्यासाठी आलेले होते. मात्र, त्याचवेळी झोपाळा तुटला आणि ही मोठी दुर्घटना घडली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *