महिनाभर अडकले होते घनदाट जंगलात; अखेर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी देवदूत बनून आला एक लाकूडतोड्या!

महिनाभर अडकले होते घनदाट जंगलात; अखेर चिमुकल्यांना वाचवण्यासाठी देवदूत बनून आला एक लाकूडतोड्या!
अॅमेझॉनच्या जंगलातून सुटका करण्यात आलेले भाऊ ग्लॉको आणि ग्लेसन

Two brothers rescued from jungle : सुमारे महिनाभरापूर्वी ब्राझीलमधील (Brazil) अॅमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये (Amazon rainforest) दोन भाऊ हरवले होते. आता या दोन्ही मुलांची जंगलातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

प्रदीप गरड

|

Mar 28, 2022 | 11:28 AM

Two brothers rescued from jungle : देव तारी त्याला कोण मारी, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी ब्राझीलमधील (Brazil) अॅमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये (Amazon rainforest) दोन भाऊ हरवले होते. आता या दोन्ही मुलांची जंगलातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, 18 फेब्रुवारी रोजी 7 वर्षांचा ग्लॉको (Glauco) आणि 9 वर्षांचा ग्लेसन (Gleison Ferreira) ब्राझीलमधील अमेजोनास राज्यातील लागो कॅपाना नेचर रिझर्व्हमध्ये त्यांच्या घरातून छोटे पक्षी पकडण्यासाठी बाहेर पडले होते. दोन्ही मुले घरी न परतल्याने अधिकाऱ्यांनी दोघांचा शोध सुरू केला. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, शेकडो रहिवासी मुलांच्या शोधात बाहेर पडले. सर्व प्रयत्न करूनही जेव्हा मुले कुठेच सापडले नाही तेव्हा 24 फेब्रुवारी रोजी आपत्कालीन सेवांनी मुलांचा शोध थांबविला. स्थानिक रहिवाशांनी मुलांचा शोध सुरू ठेवला असला तरी ते कुठेच सापडले नाहीत.

घडला चमत्कार

ग्लॉको आणि ग्लेसन पावसाळ्यात बेपत्ता झाले. पावसाळ्यात अॅमेझॉनच्या जंगलात चालणे आणखी कठीण होते. शोधमोहीम थांबल्यानंतरही मागील आठवड्यात दोन्ही मुले सुखरूप सापडली हा चमत्कारच म्हणावा लागेल. एका लाकूडतोड्याने लहान मुलांची किंकाळी ऐकली. हे दोन्ही भाऊ त्यांच्या घरापासून 4 मैल अंतरावर भेटले.

मोठ्या भावानं केली खाण्याची व्यवस्था

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलांनी त्यांच्या पालकांना सांगितले, की ते फक्त पावसाचे पाणी पिऊन जगले. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, लहान भावाला चालताना त्रास होत असताना मोठ्या भावाने दोघांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यांची सुटका झाल्यानंतर दोन्ही भावांची प्रकृती अत्यंत वाईट होती, ते कुपोषित झाल्यासारखे दिसत होते आणि त्यांना जखमाही होत्या. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की दोन्ही भाऊ जंगली फळे खाऊन जगत होते. ते अजिबात हिंमत हरले नाहीत.

आणखी वाचा :

गर्दी, तरीही शिस्त; जपान मेट्रोचा ‘हा’ Video viral; यूझर्स म्हणतायत, म्हणूनच आहेत जगात सर्वात पुढे…

Video : आधी धूर, मग स्फोट..; Ola S1 Pro स्कूटरला भररस्त्यात लागली आग, तर चांगल्या दर्जाचं साहित्य वापरल्याचा कंपनीचा दावा

Helicopter Crash : अमेरिकेत हेलिकॉप्टरचा अपघात; दोन जण ठार, घटना कॅमेऱ्यात कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें